पाच हजार क्विंटल कापूस तीन दिवसात खरेदी

By Admin | Updated: March 15, 2015 00:35 IST2015-03-15T00:21:46+5:302015-03-15T00:35:51+5:30

संजय कुलकर्णी , जालना येथील नवीन मोंढ्यात गेल्या तीन दिवसांपासून सीसीआयच्या कापूस खरेदीस प्रारंभ झाला. या तीन दिवसांमध्ये पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली

Buy five thousand quintals of cotton in three days | पाच हजार क्विंटल कापूस तीन दिवसात खरेदी

पाच हजार क्विंटल कापूस तीन दिवसात खरेदी


संजय कुलकर्णी , जालना
येथील नवीन मोंढ्यात गेल्या तीन दिवसांपासून सीसीआयच्या कापूस खरेदीस प्रारंभ झाला. या तीन दिवसांमध्ये पाच हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या काळातही शेतकऱ्यांच्या वाहनांची गर्दी आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात सीसीआयने जिनिंगमधील जागेअभावी कापसाची खरेदी बंद केली होती. पूर्ववत सुरू करताना हवामान खात्याने दिलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीच्या अंदाजामुळे ही खरेदी लांबली.
मात्र ११ तारखेपासून खरेदी पूर्ववत सुरू झाली. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा व दुसरीकडे उत्पन्नात आलेली घट यामुळे शेतकरी अगोदरच त्रस्त असताना सध्या अवकाळी पावसामुळे कापूस विक्री करण्यासही शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. मात्र काही शेतकऱ्यांनी मोंढा परिसरात तळ ठोकलेला होता.
मोसंबीची आवक समाधानकारक असून हरभरा व ज्वारीची आवक चांगली असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.
गहू १२५० ते १६६०, ज्वारी ११७० ते २३४०, मका ११७३ ते १२८१ आणि तूर ४४५० ते ६३६८ रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. मोसंबीचे दर १००० ते १७०० रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. गुळ २०३२ ते २३३० रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे.

Web Title: Buy five thousand quintals of cotton in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.