कापूस खरेदीला आज प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:34 IST2017-10-25T00:34:20+5:302017-10-25T00:34:51+5:30
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत धमार्बाद व भोकर या केंद्र्रावर कापूस खरेदीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे़

कापूस खरेदीला आज प्रारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत धमार्बाद व भोकर या केंद्र्रावर कापूस खरेदीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे़
राज्य सहकारी कापूस पणन महासंघ किंमत आधारभूत योजनेंतर्गत कापूस हंगाम सन २०१७-१८ मधील कापूस खरेदीस बुधवारी दुपारी १ वा. धमार्बाद व दुपारी ३ वा. भोकर येथील केंद्रावर संचालक नामदेवराव केशवे यांच्या हस्ते प्रारंभ होणार आहे.
शेतकºयांनी कापूस विक्रीसाठी आणण्यापूर्वी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी खरीप हंगामातील पीक पेरा क्षेत्रानुसार सातबारा उताºयाची मूळ प्रत, होल्डींग, आधारकार्ड, बॅक पासबुक झेरॉक्स, मोबाईल नंबर आदी माहिती खरेदी पूर्वनोंदणीसाठी आवश्यक आहे.
कापसाची आर्द्रता (ओलावा) १२ टक्क्यांच्या वर असल्यास असा कापूस स्वीकारल्या जाणार नाही. कापूस पणन महासंघ कापूस खरेदी करीत असून शेतकºयांच्या नावाने कापसाचा चुकारा आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे नांदेड येथील सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे विभागीय व्यवस्थापकांनी कळविले आहे़