खरेदी-विक्री व्यवहार ‘ठप्प’
By Admin | Updated: November 13, 2014 00:52 IST2014-11-13T00:44:13+5:302014-11-13T00:52:20+5:30
शिरूर अनंतपाळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘नेट’च व्यवस्थित नसल्याने त्याचा परिणाम खरेदी- विक्री व्यवहारावर झाला आहे़

खरेदी-विक्री व्यवहार ‘ठप्प’
शिरूर अनंतपाळ : येथील दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘नेट’च व्यवस्थित नसल्याने त्याचा परिणाम खरेदी- विक्री व्यवहारावर झाला आहे़ त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून खरेदी- विक्रीचा व्यवहार ठप्प झल्याने मुद्रांक विक्रेत्यांसह नागरिकही त्रस्त झाले आहेत़
खरेदी-विक्रीचा व्यवहार पारदर्शक पद्धतीने व्हावा आणि कोणाचीही फसवणूक होऊ नये, यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात आॅनलाईन खरेदी विक्री सुरु करण्यात आली़ त्यामुळे व्यवहारातील गैर प्रकारास आळा बसला आहे़ परंतु, या कार्यालयास सातत्याने कनेक्टीव्हीटीची समस्या जाणवत आहे़ गेली तीन महिन्यांपासून तर ही समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की, हे व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाचे नेट कधी होणार सेट असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत़ कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे अनेकांना वेट अँड वॉच करित दिवसभर कार्यालयात ताटकळत बसावे लागत आहे़ परिणामी मुद्रांक विक्रेत्यासह नागरिकही वैतागले आहेत़(वार्ताहर)