तब्बल ३८ कोटींची तूर खरेदी
By Admin | Updated: January 20, 2017 00:22 IST2017-01-20T00:21:46+5:302017-01-20T00:22:24+5:30
ज्ाालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले आहे.

तब्बल ३८ कोटींची तूर खरेदी
ज्ाालना : यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तुरीचे पीक जोमात आले आहे. दीड महिन्यात बाजार समितीत तब्बल ३८ कोटी रूपयांची तूर खरेदी करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत ही विक्रमी आवक आहे.
समाधानकारक पावसामुळे तुरीचे लागवड क्षेत्र वाढले. गतवर्षी दुष्काळामुळे आठ ते दहा हजार हेक्टर असलेले क्षेत्र यंदा वीस हजार हेक्टरच्या पुढे गेले आहे. दीड महिन्यात तब्बल ८० हजार ५२९ क्विंटलची आवक झाली. याची किंमत ३७ कोटी ८४ लाख ८६ हजार ३०० एवढी आहे. यावर्षी ही आवक सुमारे अडीच लाख क्विंटल होण्याचा अंदाज बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांनी व्यक्त केला. खाजगी व्यापारी तसेच नाफेडकडूनही तूर खरेदी सुरू आहे. गुरूवारी ७ हजार ३१३ क्विंटल तुरीची आवक झाली. दररोज पाच ते सात हजार क्विंटल तुरीची आवक होत असल्याचे चौगुले यांनी सांगितले. गतवर्षी संपूर्ण हंगाम मिळून सुमारे १ लाख क्विंटल तुरीची आवक झाली होती. तसेच आवक कमी झाल्याने तुरीचे भाव गगनाला भिडले प्रति क्विंटल १४ हजार रूपयांपर्यंत भाव गेला होता. (प्रतिनिधी)