टायरअभावी उभ्या बसेस; दररोज १ लाखांचा फटका
By Admin | Updated: August 23, 2014 00:47 IST2014-08-23T00:03:08+5:302014-08-23T00:47:41+5:30
किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे.

टायरअभावी उभ्या बसेस; दररोज १ लाखांचा फटका
किनवट : वाहकांची विविध पदे रिक्त, सुट्या भागांचीही वाणवा आणि टायर नसल्याने ९ बसेस आगारातच उभ्या असल्याने यापोटी दररोज १ लाख रुपयांचा फटका किनवट आगाराला बसत आहे. याकडे आगाराच्या वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.
जिल्ह्याच्या दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या किनवट आगाराच्या विविध समस्या आहेत. या आगारात ४५ गाड्या आहेत. अनेक गाड्या कालबाह्य झाल्या. गाड्यांची अवस्था खराब असल्याने रस्त्यातच गाड्या बंद पडतात. किनवट येथून जाणाऱ्या रेल्वे तसेच खाजगी प्रवासी यांना तोंड देत कमी मनुष्य बळावर आगाराने उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत. या प्रयत्नामुळे दररोज चार लाख रुपयांचे उत्पन्न किनवट आगाराला मिळत आहे. असे असताना मात्र किनवट आगारात वाहकांची २७ पदे रिक्त आहे. गाड्यांची देखभाल करण्यासाठी सुटे भाग उपलब्ध नाहीत. टायरचा दुष्काळ असल्याने ९ गाड्या आगारात निव्वळ उभ्या आहेत. वाहकाची पदे रिक्त व टायरअभावी गाड्या उभ्याच असल्याने चालक रिकामे फिरत आहेत. पर्यायाने चालकांना सक्तीची रजा दिली जात आहे. टायर नाही, सुटे भाग नाही, वाहकाची रिक्त पदे त्यातच खाजगी प्रवासी वाहतुकीला जोर व सद्या तालुक्यावर ओढावलेली दुष्काळी परिस्थिती असतानाही आगार उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करीत आहे. (वार्ताहर)