बेवारस बॅगने उडविली धांदल

By Admin | Updated: September 17, 2014 00:21 IST2014-09-17T00:10:19+5:302014-09-17T00:21:04+5:30

परभणी: शहरातील भाग्यनगर भागात आढळून आलेल्या बेवारस बॅगने परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडविल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली़

Busted bunny hurried | बेवारस बॅगने उडविली धांदल

बेवारस बॅगने उडविली धांदल

परभणी: शहरातील भाग्यनगर भागात आढळून आलेल्या बेवारस बॅगने परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडविल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली़
कारेगाव रस्त्यावरील भाग्यनगर भागात देशपांडे यांच्या घराजवळ १५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एक काळ्या रंगाची बॅग एका नागरिकास दिसून आली़ याबाबत त्याने बॅगविषयी चौकशी केली असता ती बेवारस असल्याचे निदर्शनास आले़ तातडीने ही माहिती पोलिसांना देण्यात आली़ काही क्षणात बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर, चिंचाणे, वहीब, रासकटला हे श्वानासह घटनास्थळी दाखल झाले़ त्यांच्या पथकातील ‘डॉन’ नावाच्या श्वानाने या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये कपडे असल्याचे दिसून आले़ त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ या दरम्यान, बेवारस बॅगची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली़ त्यामुळे बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़

Web Title: Busted bunny hurried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.