शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक संतोष लड्डा दरोडाप्रकरण: अंबाजोगाईतून आणखी एक आरोपी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 14:58 IST

गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपी निष्पन्न केले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगर भागातील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी टाकलेल्या दरोड्याच्या गुन्ह्यात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतून आणखी एका आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठाेकल्या आहेत. या आरोपीस सोमवारी न्यायालयात हजर केले असता, २६ जूनपर्यंत पोलिस कोठडी मंजूर करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

राजेश श्रीकृष्ण साठे (३०, रा. भटगल्ली, अंबाजोगाई, जि. बीड) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी १५ मे रोजी मध्यरात्रीनंतर सहा आरोपींनी धाडसी दरोडा टाकला होता. त्यात साडेपाच किलो सोन्याचे दागिने, ३२ किलो चांदीचे दागिने व भांडी, ७० हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर गुन्हे शाखा प्रकरणाचा तपास करीत आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपी निष्पन्न केले आहेत. त्यात मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा एन्काउंटर करण्यात आला. त्याचवेळी अटकेतील आरोपींची संख्या २०वर गेली आहे. अंबाजोगाई येथून अटक केलेला राजेश साठे हा सुरेश उर्फ सूर्यकांत गंगणे याच्यासह मृत अमोल खोतकर या दोघांचा मित्र होता. दरोड्याच्या दिवशी तो त्यांच्यासोबतच होता. त्याच्याकडेही चोरीतील मोठ्या प्रमाणात मुद्देमाल असण्याची शक्यता पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर यांच्यासह हवालदार संदीप तायडे, अंमलदार विलास मुठे, संतोष चौरे यांच्या पथकाने साठे यास अंबाजोगाईतून उचलले.

आरोपींची संख्या वाढणारगुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले प्रमुख आरोपी अतिशय कुख्यात असल्यामुळे कोणीही माहिती देण्यास पुढे येत नाही. त्याचवेळी मृत अमोल खोतकर याच्या बहिणीच्या चौकशीत ३२ किलो चांदीचे दागिने आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. त्याशिवाय चोरीतील अर्धा किलोपेक्षा अधिक सोनेही परत मिळवले आहे. उर्वरित सोने हस्तगत करण्यासाठी काही महिलांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर