शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

एन्काउंटर झालेल्या अमोलच्या बहिणीला अटक; सात जिवंत काडतुसांसह २२ तोळे सोने सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 12:41 IST

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार लड्डा यांच्या बंगल्यात १५ मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लुटली. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे.

छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगर येथील बंगल्यातील दरोडा प्रकरणात मुख्य आरोपी तथा पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये मारला गेलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री अटक केली. तिच्याकडून पोलिसांनी घरातील तुळशी वृंदावनाच्या खाली जमिनीत हातमोजामध्ये लपवून ठेवलेले २२ तोळे सोन्याचे दागिने आणि ७ जिवंत काडतुसे जप्त केली. आरोपी रोहिणी बाबूराव खोतकर (वय ३५, रा. आर्च आंगण, पडेगाव) हिस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संभाजी पवार यांनी दिली.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार लड्डा यांच्या बंगल्यात १५ मेच्या रात्री सहा दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोने, ३२ किलो चांदी लुटली. गुन्हे शाखेने आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. एपीआय रविकांत गच्चे यांनी २६ मे रोजी साजापूर रस्त्यावर अमोलचे एन्काउंटर केले होते. खोतकरची बहीण रोहिणी हिच्या चौकशीत तिने पडेगाव येथील गॅरेजसमोर लावलेल्या कारच्या डिकीत चांदी असल्याचे सांगितले होते. तेव्हा पोलिसांनी ३१ किलो चांदी जप्त केली होती. अमोलची मैत्रीण खुशीच्या चौकशीत तिने रोहिणीकडे सोन्याचे दागिने असल्याचा जबाब पोलिसांना दिला होता.

संशयास्पद कॉल; पोलिस गोवा, कर्नाटकात जाणारखोतकरचा मित्र आणि आरोपी सुरेश गंगणे आणि रोहिणीच्या एका मैत्रिणीनेदेखील दागिने तिच्याकडेच असल्याचे पोलिसांना सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी रोहिणीला चौकशीसाठी बोलावले होते. ती १८ जून रोजी मोबाइल बंद करून गोव्याला निघून गेली. गोवा आणि कर्नाटक येथे वास्तव्यास असलेला तिचा मित्र रणजितकडे तिने दागिने दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे गुन्हे शाखेची पथके गोवा आणि कर्नाटक येथे तपासाला जाणार आहेत. दरम्यान, रोहिणीने नवीन सीमकार्ड घेतले. तिने तीन संशयास्पद लोकांना कॉल केल्याचे तपासात समजले. त्यामुळे पोलिसांनी तिला सोमवारी रात्री अटक करण्याचा निर्णय घेतला. एपीआय जयश्री कुलकर्णी यांनी न्यायालयाच्या परवानगीने तिच्या अटकेची प्रक्रिया पार पाडली. मंगळवारी रोहिणीला न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अमोलकडे दोन पिस्तुलेअमोलकडे दोन पिस्तुले होती. त्यातील एकातून त्याने पोलिसांवर गोळीबार केला होता. ते पिस्तूल पोलिसांनी यापूर्वीच जप्त केले. कुख्यात दरोडेखोर सुरेश गंगणेचा मित्र राजेश साठे याला दोन दिवसांपूर्वी अटक केल्यानंतर त्याच्याकडूनही ४ तोळे सोने जप्त केले. गुन्हे शाखेने आतापर्यंत ७९४ ग्रॅम सोने, ३२ किलो चांदीचे भांडे, ८ लाख रुपये रोख, ३ चारचाकी व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर