व्यापारी मयूर देविदान यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:03 IST2017-10-02T00:03:13+5:302017-10-02T00:03:13+5:30
प्रतिष्ठित व्यापारी मयुर ओमप्रकाश देविदान (३०) यांनी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफाळ घेऊन आत्महत्या केली.

व्यापारी मयूर देविदान यांची आत्महत्या
जालना : शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मयुर ओमप्रकाश देविदान (३०) यांनी पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफाळ घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.
देविदान शनिवारी रात्री दहा वाजता आपल्या खोलीत जाऊन झोपले. दसरा असल्यामुळे त्यांच्या कुटुंबातील सदस्य रात्री उशिरापर्यंत जागे होते. सकाळी दहा वाजता पत्नीने वारंवार आवाज देऊनही त्यांनी खोलीचे दार उघडले नाही. त्यामुळे कुटुंबियांनी दरवाजा तोडला असता, देविदान यांचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. सदर बाजार पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. देविदान यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.