व्यापारी-संचालकावर गुन्हा दाखल
By Admin | Updated: December 9, 2015 00:41 IST2015-12-09T00:26:06+5:302015-12-09T00:41:27+5:30
औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व संचालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापारी आणि संचालकावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात

व्यापारी-संचालकावर गुन्हा दाखल
औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापारी व संचालकांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यापारी आणि संचालकावर परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आले असून, संचालकाविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील संचालक रविंद्र गायकवाड यांनी ३ डिसेंबर रोजी ५ वाजता येथील व्यापारी व खरेदीदार आडते गणपतराव गणापुरे यांची निलंगा-बीदर मार्गावर औराद शहाजानी येथे ट्रक आडवून मी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे. तुम्हाला व आडत मालकाला आडत चालवायची असेल तर हजार रुपये द्यावे लागतील नाहीत, तर आडत चालू देणार नाही, असे म्हणून धमकी देत खंडणी मागितली होती. याप्रकरणी दिलीप इंद्रजीत कलगणे या मुनीमाच्या फिर्यादीवरुन संचालक रवींद्र गायकवाड याच्याविरोधात कलम ३८५, ३४१, ५०४ भादंविप्रमाणे औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर व्यापारी गणपतराव पांडुरंग गणापुरे व नागनाथ महादाप्पा पंचाक्षरी दोघे रा. औराद शहाजानी यांच्या फिर्यादीवरुन औराद शहाजानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र शिवाजी गायकवाड यास ३ डिसेंबर रोजी १ वाजण्याच्या सुमारास तूर भरलेला ट्रक निलंगा-बीदर मार्गावर ट्रकमधील असलेले मालाचे कबाले याबाबत विचारणा केली असता या दोघांनी संगनमत करुन तू कुठला संचालक? असे म्हणून रवींद्र गायकवाड यांना अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी औराद शहाजानी पोलीस ठाण्यात संचालक गायकवाड यांच्या फिर्यादीवरुन गणपतराव गणापुरे, नागनाथ पंचाक्षरी यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी शेलार हे करित आहेत.