अंबाजोगाई रोडवरील नव्या बसस्थानकातून बसेस धावणार

By Admin | Updated: December 5, 2014 00:53 IST2014-12-05T00:36:43+5:302014-12-05T00:53:04+5:30

लातूर : शहरातील मुख्य बसस्थानकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अंबाजोगाई रोडवरील बसस्थानकातून बसेस सोडण्याचा निर्णय एस.टी. प्रशासनाने घेतला आहे

Buses will be run from new bus station on Ambujogai road | अंबाजोगाई रोडवरील नव्या बसस्थानकातून बसेस धावणार

अंबाजोगाई रोडवरील नव्या बसस्थानकातून बसेस धावणार


लातूर : शहरातील मुख्य बसस्थानकातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी अंबाजोगाई रोडवरील बसस्थानकातून बसेस सोडण्याचा निर्णय एस.टी. प्रशासनाने घेतला आहे. कोणत्या गाड्या या बसस्थानकातून सोडायच्या, याचे नियोजन झाले असून, १५ डिसेंबरपासून या बसस्थानकातून गाड्या सुटणार आहेत.
मध्यवर्ती बसस्थानकात बसेस मागे-पुढे घेताना अपघात झाल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत़ त्यामुळे विभाग नियंत्रक डी़बी़ माने यांनी अंबाजोगाई रोडवरील बसस्थानकाचा वापर करून मध्यवर्ती बसस्थानकातील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयानुसार १५ डिसेंबरपासून अंबाजोगाई रोडवरील नवीन बसस्थानकातून काही गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. या बसस्थानकावरून परभणी, जळगाव, औरंगाबाद, शिर्डी, सेलू, शेगाव, माजलगाव, परतूर, पाथरी, मानवत, मेहकर, बीड, हिंंगोली, नाशिक, कळमनुरी, जिंतूर, परळी, अंबाजोगाई, बुलढाणा, इगतपुरी, गंगापूर आदी बसेस नवीन बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)४
अंबाजोगाई रोडवरील बसस्थानक क्रमांक २ ची इमारत गेल्या अनेक दिवसांपासून वापराविना धूळखात पडून होती़ त्यामुळे विभाग नियंत्रक डी़बी़माने यांनी या बसस्थानकाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. अंबाजोगाई रोड मार्गावरून ये-जा करणाऱ्या बसेसचे वेळापत्रक करण्यात आले असून, त्या बसेस याच बसस्थानकातून सुटणार आहेत.
४या नवीन बसस्थानकाची माहिती प्रवाशांना व्हावी म्हणून जनजागृतीही केली जाणार आहे. त्याचबरोबर ‘एस.टी.नेच प्रवास सुखकर होतो’ यासंबंधीही जनजागृती महामंडळाच्या वतीने सुरू असल्याचे विभाग नियंत्रकांनी सांगितले.

Web Title: Buses will be run from new bus station on Ambujogai road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.