शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध, लहान मुले रस्त्यावर ताटकळले तरीही बस थांबेना, शेवटी 'तो' बससमोरच उभा राहीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 17:54 IST

प्रवाशांसाठी समोर उभे राहून अडवली बस; वाळूजमध्ये बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल

वाळूज महानगर : एसटी महामंडळाच्या बस वाळूजमध्ये न थांबता निघून जात असल्याने प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागते. अनेकदा लेखी, तोंडी मागणी करूनही ‘बस थांबा’ दिला जात नसल्याने सामाजिक कार्यकर्ते रतन अंबिलवादे यांनी शनिवारी दुपारी पुण्याला जाणारी बस अडवून समोरील बाजूने वर चढत प्रवाशांना आत बसवून दिले. यामुळे काही काळ नगर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

मागील तीन दशकांपासून वाळूज येथील नागरिक स्वतंत्र बसस्थानकाची मागणी करत असूनही एसटी महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे. याप्रकरणी आगारप्रमुखांशी संपर्क साधला असता, या प्रकरणाची अधिक माहिती घेत असल्याचे सांगितले.

काय घडले शनिवारी?वाळूज येथील पोलिस ठाण्यासमोर १० ते १२ प्रवासी सुमारे अडीच ते तीन तासांपासून अहमदनगर आणि पुणे येथे जाण्याकरिता बसची वाट पाहत होते. दरम्यान अनेक बस आल्या आणि न थांबता निघून गेल्या. ही माहिती वाळूज येथील सामाजिक कार्यकर्ते रतन अंबिलवादे यांना मिळताच त्यांनी जळगाव ते पुणे बस (क्र. एमएच २० जीएस ३६२६) समोर आडवे येत ती थांबवली. चालक आणि वाहकांनी खाली उतरून अंबिलवादे यांना जाब विचारत अंबिलवादे यांचा बसवर चढलेला फोटाे काढून घेतला. वाहतूक कोंडी होत असल्याने वाळूज पोलिसांनी धाव घेतली. अंबिलवादे व वाहकाची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली.

शासनाच्या योजनांचा काय उपयोग?एकीकडे राज्य शासन महिला, वृद्धांना बस प्रवासामध्ये सवलत देत आहे. दुसरीकडे मात्र, थांबा न दिल्याने बस थांबत नसतील तर प्रवाशांना या योजनांचा काय उपयोग, असा संतप्त सवाल प्रवाशांनी उपस्थित केला.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादstate transportएसटीWalujवाळूज