उभी बस दोनशे फूट पुढे सरकली
By Admin | Updated: May 15, 2016 00:04 IST2016-05-15T00:02:07+5:302016-05-15T00:04:07+5:30
औरंगाबाद : शहर बस स्वच्छ करताना अचानक सुरू झाली आणि तब्बल २०० फुटांवर जाऊन थांबल्याची घटना शनिवारी सकाळी एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळा परिसरातील आगार क्रमांक-१ च्या आवारात घडली.

उभी बस दोनशे फूट पुढे सरकली
औरंगाबाद : कर्तव्यावर जाण्याआधी उभी केलेली शहर बस स्वच्छ करताना अचानक सुरू झाली आणि तब्बल २०० फुटांवर जाऊन थांबल्याची घटना शनिवारी सकाळी एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळा परिसरातील आगार क्रमांक-१ च्या आवारात घडली. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुखदेव साळुंके, असे जखमी चालकाचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी ५.४५ वाजता कर्तव्यावर जाण्याआधी त्यांनी आगारातील वॉशिंग पॉइंटवर बस उभी केली. यावेळी बसवर पाणी मारले. त्यानंतर ते बसच्या समोरील भागावर उभे राहून काच पुसत होते. यावेळी अचानक बस सुरू झाली. काही क्षणांतच बस वेगाने पुढे आल्याने सुखदेव साळुंके बाजूला फेकले गेले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत आगार व्यवस्थापकांकडून तक्रार अर्ज देण्यात आल्याची माहिती सिडको एमआयडीसी पोलिसांनी दिली. वॉशिंग पॉइंटवरील उतारामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक ए.यू. पठाण यांनी सांगितले, सदर अपघात नेमका कशामुळे झाला हे आताच सांगता येणार नाही. चालकाकडून त्यासंदर्भात अधिक माहिती घेता येईल.