बसची मोटारसायकलला धडक; दोन जण ठार
By Admin | Updated: October 22, 2014 01:19 IST2014-10-22T00:22:31+5:302014-10-22T01:19:54+5:30
औरंगाबाद : जालना रोडवरील सुंदरवाडी पेट्रोल पंपाजवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली.

बसची मोटारसायकलला धडक; दोन जण ठार
औरंगाबाद : जालना रोडवरील सुंदरवाडी पेट्रोल पंपाजवळ भरधाव बसने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जण ठार झाल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातातील एक मुकुंदवाडीचा असून दुसऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
दिनेश गंगाधर राऊत (२५, रा. मुकुंदवाडी) असे मयताचे नाव आहे. तर दुसऱ्याचे नाव समजलेले नाही. दोघेही सुंदरवाडी पंपाजवळून मोटारसायकलवर बसून यू टर्न घेऊन औरंगाबादच्या दिशेने निघाले होते. त्याच वेळी जालन्याहून औरंगाबादकडे भरधाव येणाऱ्या बसने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. सरकारी रुग्णवाहिकेने दोघांना जखमी अवस्थेत घाटीत दाखल केले; परंतु डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ शेख शकील करीत आहेत.