दोन महिन्यांपासून बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

By Admin | Updated: July 8, 2014 00:56 IST2014-07-07T23:10:59+5:302014-07-08T00:56:12+5:30

कडा: आष्टी तालुक्यातील कडा ते डोईठाण या मार्गावरील बस दोन महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

Since the bus has been closed for two months | दोन महिन्यांपासून बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

दोन महिन्यांपासून बस बंद असल्याने विद्यार्थ्यांचे हाल

कडा: आष्टी तालुक्यातील कडा ते डोईठाण या मार्गावरील बस दोन महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचे हाल होत आहेत.
कडा येथे शाळा, महाविद्यालय असल्याने परिसरातील दहा ते बारा गावचे विद्यार्थी येथे शिक्षणासाठी दररोज येत असतात. असे असले तरी गेल्या काही दिवसात कडा ते डोईठाण या मार्गावरील बस बंद करण्यात आली आहे. यामुळे डोईठाणसह निंबोडी, खिळद, पाटण, सांगवी यासह इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
या वीस कि.मी.च्या अंतरावरील बस दोन महिन्यांपासून बंद आहेत. अशातच शाळा महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना आता खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. अशा वाहनात अपघाताचा धोका तर आहेत शिवाय आर्थिक भुर्दंडही पडत आहे. विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचेही बस नसल्याने हाल होत आहेत. यामुळे या मार्गावर बस सुरू करण्याची मागणी अशोक चौगुले, दादा जगताप यांनी केली आहे. याबाबत आष्टी आगार प्रमुख सचिन शिंदे म्हणाले की, बंद झालेली बस दोन दिवसात सुरू करण्यात येईल. (वार्ताहर)

Web Title: Since the bus has been closed for two months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.