बसने दोन दुचाकींना उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 00:53 IST2017-09-19T00:53:18+5:302017-09-19T00:53:18+5:30
भरधाव बसने दोन दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले.

बसने दोन दुचाकींना उडविले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : भरधाव बसने दोन दुचाकीला उडविल्याने दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला, तर दाम्पत्य गंभीर जखमी झाले. जालना-देऊळगावराजा रोडवरील आनंदगडाजवळ सोमवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.
अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव शेख गुलाब शेख फकीर (रा.पिंपळगावसोनार, ता. सिंदखेडराजा, जि.बुलडाणा) असे आहे. यात दुचाकीस्वार चंदनझिरा येथील रामदास शेनफड म्हस्के (४५) व पुष्पा रामदास म्हस्के (४०) हे दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. पुष्पा म्हस्के यांच्या डोक्याला गंंभीर इजा झाल्याने त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रामदास म्हस्के यांना उपचारासाठी औरंगाबाद शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत शेख व म्हस्के दाम्पत्य दोन दुचाकीवरून जालन्याकडे येत होते. जालना बसस्थानकातून अकोल्याकडे निघालेल्या औरंगाबाद-अकोला बसने आनंदगड घाटात दोन्ही दुचाकींना उडविले. यात शेख गुलाब यांचा जागीच मृत्यू झाला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, तालुका ठाण्याचे सहायक निरीक्षक सानप, कणखर घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.