जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची बस कंटेनरला धडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST2021-02-06T04:07:14+5:302021-02-06T04:07:14+5:30

लिंबेजळगाव : औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला भागात मिनी बस उभ्या असणाऱ्या कंटेनरवर धडकल्याने या अपघातात ११ प्रवासी जखमी ...

The bus carrying devotees returning from Jejuri hit the container | जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची बस कंटेनरला धडकली

जेजुरीहून परतणाऱ्या भाविकांची बस कंटेनरला धडकली

लिंबेजळगाव : औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला भागात मिनी बस उभ्या असणाऱ्या कंटेनरवर धडकल्याने या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली. जेजुरीहून नागपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या या मिनी बसचा या भीषण अपघातात अक्षरशः चुराडा झाला असून तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर येथील १२ जण मिनी बसने जेजुरीला दर्शनासाठी गेले होते. येथून परतताना त्यांची बस (एम.एच.४९ जे ०६३४) औरंगाबाद-नगर महामार्गावरील दहेगाव बंगला येथे रस्त्यात उभ्या असलेल्या मालवाहू कंटेनरवर (एम.एच.४० बी.जी ६६७७) येऊन धडकली. शुक्रवारी पहाटे हा अपघात झाला असून यात हर्षदा ठाकरे (वय १०), बंडूजी ठाकरे (४१), रामभाऊ ठाकरे (७५), स्नेहा गावंडे (३०), अश्विन गावंडे (४०), माधव गावंडे (५०), विकास म्हस्के (५०, सर्व रा. नागपूर) आदी जण जखमी झाले आहेत. नागरिकांनी जखमींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बस भरधाव असल्याने रस्त्यात उभ्या असलेल्या कंटेनरचा अंदाज चालकास न आल्याने ती थेट कंटेनरवर जाऊन धडकली. या अपघातात बसचा अक्षरश: चुराडा झाला. पोलिसांनी नागरिकांच्या सहाय्याने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात हलविले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

---- अपघाताच्या घटना वाढल्या -------

औरंगाबाद-नगर महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या मार्गावर नादुरुस्त तसेच व अवजड वाहने शिस्त पाळत नसल्याने अधिक अपघात होत असून याचा फटका नागरिकांना बसत आहे. वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन शिवराईजवळ, टोलनाका परिसर, लिंबेजळगाव बस्टॅण्डवर, जिकठाण फाट्याजवळ, रहीमपूर फाटा, दहेगाव बंगला, इसारवाडी फाटा, लोखंडी पूल ही अपघातस्थळे असून येथे दिवसागणिक अपघाताचे सत्र सुरू असते.

-- कॅप्शन : दहेगाव बंगला परिसरात झालेल्या अपघातात मिनी बसचा असा चुराडा झाला.

Web Title: The bus carrying devotees returning from Jejuri hit the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.