जळित, अतिदक्षता कक्षातील एसी बंद
By Admin | Updated: July 11, 2014 00:59 IST2014-07-10T23:49:46+5:302014-07-11T00:59:06+5:30
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि जळित विभागातील एसी यंत्रणाही गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत़

जळित, अतिदक्षता कक्षातील एसी बंद
उस्मानाबाद : अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभाग आणि जळित विभागातील एसी यंत्रणाही गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत़ यामुळे जळित विभागात दाखल असलेल्या रूग्णांचे मोठे हाल होत आहेत़
एखाद्या घटनेत होरपळलेला व्यक्ती असो अथवा महिला असो तीस उपचारासाठी जिल्हा रूग्णालयातच दाखल करण्यात येते़ शिवाय अपघातातील गंभीर जखमींनाही येथेच उपचचारासाठी आणले जाते. रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांच्या सोयीसाठी अतिदक्षता विभागात तीन तर जळित विभागात चार एसी आहेत़ अतिदक्षता विभागातील तीन पैकी एक तर जळीत विभागातील चार पैकी दोन एसी चालू आहेत़ तर दोन एसी अद्याप बसविण्यात आलेले नाहीत़ यामुळे रूग्णांचे मोठे हाल होत असून, हे एसी सुरू करण्याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने संताप व्यक्त होत आहे़ (प्रतिनिधी)
दोन वर्षानंतर लिफ्ट कार्यान्वित
जिल्हा रूगणालयात जवळपास दीड ते दोन वर्षे बंद असलेली लिफ्ट सुरू करण्यात आली आहे़ लिफ्ट सुरू झाल्याने रूग्णांसह अपंगांची होणारी हेळसांड थांबली आहे़ यापुढील तांत्रिक बिघाडही त्वरित काढून लिफ्ट बंद होण्याचा प्रकार पुन्हा घडू नये, याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे़
लवकरच दुरूस्ती करू
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपामुळे रूग्णालयातील काही समस्या सोडविताना अडचणी आल्या़ रूग्णांच्या सेवेचे काम करण्यात येत असल्याने त्याकडे दुर्लक्ष झाले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा संप मिटला असून, लवकरच अतिदक्षता विभाग व जळित विभागातील बंद असलेल्या एसी सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ जयपाल चव्हाण यांनी सांगितले़