पत्नीस जाळून मारले; सात वर्षांची शिक्षा

By Admin | Updated: March 17, 2016 23:51 IST2016-03-17T23:47:31+5:302016-03-17T23:51:08+5:30

वसमत : दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारणाऱ्या पतीस सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

Burned his wife; Seven years of education | पत्नीस जाळून मारले; सात वर्षांची शिक्षा

पत्नीस जाळून मारले; सात वर्षांची शिक्षा

वसमत : दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जीवे मारणाऱ्या पतीस सात वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. वसमतच्या अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने गुरूवारी हा निकाल दिला.
औंढा तालुक्यातील चिंचोली येथील विवाहिता वनिता उद्धव मोरे हिस तिचा पती उद्धव मोरे याने ७ जुलै २०१३ चे दुपारी अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. दारु पिण्यास पैसे न दिल्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याचे वनिता मोरे हिने मृत्यूपुर्व जवाबात नमूद केले होते. औंढा पोलिसांत हे प्रकरण दाखल होते. त्यांनी तपास करून न्यायालयात दोषारोप दाखल केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झघला. सदर प्रकरणी १७ मार्च रोजी वसमत अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी.एन. आरगडे यांनी निकाल दिला. यात आरोपी उद्धव मोरे यास सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. अमृता अंभोरे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. श्रीधर पाचलिंग यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Burned his wife; Seven years of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.