पत्नीला जाळले; पतीला सात वर्ष सक्तमजुरी
By Admin | Updated: August 9, 2014 00:39 IST2014-08-09T00:19:05+5:302014-08-09T00:39:08+5:30
बिलोली: लग्नाच्या वर्षभरानंतरच दुचाकीची मागणी करून पूर्ण झाली नसल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणाला बिलोलीच्या

पत्नीला जाळले; पतीला सात वर्ष सक्तमजुरी
बिलोली: लग्नाच्या वर्षभरानंतरच दुचाकीची मागणी करून पूर्ण झाली नसल्याने पत्नीला जिवंत जाळणाऱ्या सुजलेगाव येथील तरुणाला बिलोलीच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने सात वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे़
नायगाव तालुक्यातील सुजलेगाव स्थित संदीप तुमवाड (वय २५) याचा २००९ मध्ये मोघाळीस्थित संगीता हिज सोबत विवाह झाला़ सासरच्या मंडळीकडून या ना त्या कारणाचा तगादा सुरू झाला़ पती संदीप याने दुचाकीची मागणी केली़ माहेरकडून पूर्तता झाली नसल्याने ३ मार्च २०१० रोजी संगीता उर्फ कृष्णाबाई (वय २२) हिस जाळण्यात आले़ ज्यात ती मरण पावली़ घटनेनंतर कुंटूर पोलिसा तिघांविरूद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाला़
पती, सासू, सासरे यांना अटक झाली़ प्रकरण बिलोलीच्या सत्र न्यायालयात दाखल झाले़ न्या़एक़े़ पाटील यांच्यासमोर चाललेल्या सुनावणीत पती संदीप हा दोषी आढळला़ पण सबळ पुरावा सासू सासऱ्याविरूद्ध सिद्ध होवू शकला नाही़
वर्षभरातच पत्नीचा छळ करून पत्नीला जीवंत जाळल्या प्रकरणी आरोपी संदीप तुमवाड यास सात वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात आला़ सरकार पक्षाची बाजू अॅड़नीळकंठ कदम यांनी मांडली़ सासू-सासऱ्यांना निर्दोष सोडण्यात आले़ (वार्ताहर)