‘त्या’ अनोळखी मृतदेहाचा दफनविधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:05 IST2021-06-11T04:05:17+5:302021-06-11T04:05:17+5:30
वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी बजाजनगरात खून झालेल्या त्या अनोळखी महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) ते पार्थिव ...

‘त्या’ अनोळखी मृतदेहाचा दफनविधी
वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी बजाजनगरात खून झालेल्या त्या अनोळखी महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी गुरुवारी (दि. १०) ते पार्थिव बेगमपुरा स्मशानभूमीत दफन करून अंत्यसंस्काराची प्रकिया पार पाडण्यात आली. या महिलेची ओळख पटत नसल्याने तिच्या खुनाचे गूढ मात्र कायम आहे.
बजाजनगरातील एस.टी. कॉलनीत २ जूनला अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला होता. अज्ञात मारेकऱ्याने खून करून मृतदेह बजाजनगरात टाकल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. शवविच्छेदन अहवालात ती महिला तीन महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आले. मात्र तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्याने आठवडाभरापासून मृतदेह ओळख पटविण्यासाठी शासकीय रुग्णालयातील शवागृहात ठेवला होता. या कालावधीत मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शोधमोहिम राबविण्यात आली. मात्र ओळखच पटत नाही. मृतदेह कुजण्याची शक्यता असल्याने गुरुवारी सायंकाळी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पंचशीला महिला बचत गटाच्या मदतीने अंत्यसंस्काराची प्रकिया पार पाडल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी सांगितले.
--------------------------------