भूममध्ये घरफोडी
By Admin | Updated: February 12, 2015 00:56 IST2015-02-12T00:52:41+5:302015-02-12T00:56:23+5:30
भूम : शहरातील कुसूमनगर भागातील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

भूममध्ये घरफोडी
भूम : शहरातील कुसूमनगर भागातील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून चार लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील कुसूम नगर भागामध्ये पुष्पा आश्रुबा पवार यांचे घर आहे. काही कामानिमित्त घरातील सर्वच मंडळी बाहेरगावी गेली होती. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजावरील कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश मिळविला. त्यानंतर घरातील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील चांदीच्या देवीच्या मुर्ती, भांडी, सोन्याचे दागिने आणि ७० हजार रूपये रोख असा तब्बल चार लाख ५२ हजार रूपयांचा मुद्देमाल घेवून चोरटे पसार झाले. या प्रकरणी पुष्पा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये भिती
रामहरीनगर भागातही दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. तसेच कमल देवरे यांचेही घर फोडून काही सोन्याचे दागिने चोरीला गेले आहे. या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)