घरफोडीतील चोरटा जेरबंद
By Admin | Updated: June 16, 2017 23:36 IST2017-06-16T23:33:33+5:302017-06-16T23:36:37+5:30
नांदेड: शहरातील लक्ष्मीनारायणनगर येथे घरफोडी करुन ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पकडले

घरफोडीतील चोरटा जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शहरातील लक्ष्मीनारायणनगर येथे घरफोडी करुन ६७ हजारांचा ऐवज लंपास केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला पकडले असून त्याच्याकडून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला़ तर न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली़
लक्ष्मीनारायणनगर येथे रत्नमाला शेषराव कानिंदे या घरात झोपलेल्या असताना, गॅलरीतून चोरट्याने आत प्रवेश केला़ घरातील मोबाईल, रोख चार हजार रुपये, सोने आणि चांदीचे दागिने असा एकूण ६७ हजारांचा ऐवज लंपास केला होता़ याप्रकरणी ४ जून रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती़ त्यानुसार, सांगवी येथील श्रीकांत भगत याला ताब्यात घेवून पोलिसी खाक्या दाखविताच त्याने चोरीची कबुली दिली़ त्याच्याकडून पोलिसांनी दोन मोबाईल, सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केला़