दिवसाढवळ्या काटी येथे घरफोडी
By Admin | Updated: January 28, 2017 23:37 IST2017-01-28T23:36:23+5:302017-01-28T23:37:46+5:30
तामलवाडी : भरदिवसा घराचा पत्रा उचकटून घरातील नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.

दिवसाढवळ्या काटी येथे घरफोडी
तामलवाडी : भरदिवसा घराचा पत्रा उचकटून घरातील नव्वद हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील काटी येथे शुक्रवारी घडली असून, याप्रकरणी शनिवारी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसाननी दिलेली माहिती अशी की, काटी येथे भरवस्तीत राहणाऱ्या सिंधु दादाराव फंड या शुक्रवारी सात वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. हीच संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराचा पत्रा उचकटून आत प्रवेश मिळविला. यावेळी घरातील पत्र्याच्या पेटीचे कुलूप तोडून चोरट्यांनी आतील ९० हजार ४०० रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
रात्री आठ वाजेच्या सुमारास सिंधु फंड या घरी परत आल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शनिवारी तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)