साऊथ सिटीत चोरट्याने बंद घर फोडले
By | Updated: November 26, 2020 04:12 IST2020-11-26T04:12:23+5:302020-11-26T04:12:23+5:30
विनोद लक्ष्मण पाटील (३०) हे पत्नीसह सिडको वाळूज महानगरातील साऊथ सिटीत भाडयाच्या घरामध्ये राहतात. दिवाळीसाठी ते १३ नोव्हेंबरला रात्री ...

साऊथ सिटीत चोरट्याने बंद घर फोडले
विनोद लक्ष्मण पाटील (३०) हे पत्नीसह सिडको वाळूज महानगरातील साऊथ सिटीत भाडयाच्या घरामध्ये राहतात. दिवाळीसाठी ते १३ नोव्हेंबरला रात्री घराला कुलूप लावून पत्नीसह मूळगावी कोळे जि.सांगली या ठिकाणी गेले होते. दरम्यान, २१ नोव्हेंबरला घरमालक रावसाहेब बोर्डे यांना भाडेकरु विनोद पाटील यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसून आल्यामुळे तसेच दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे घरमालक बोर्डे यांनी खिडकीतून हात घालत दरवाजा उघडला असता त्यांना घरातील साहित्य अस्त-व्यस्त पडलेले दिसून आले. बोर्डे यांनी पाटील यांना या प्रकाराची माहिती दिली.२२ नोव्हेंबरला गावावरुन पाटील साऊथ सिटीत घरी येऊन पाहणी केली. यावेळी पाटील यांना घरातील १५ हजाराचा टीव्ही संच, रोख ३ हजार रुपये व १ हजाराची मनगटी घड्याळ असा एकूण १९ हजारांचा ऐवज गायब असल्याचे दिसून आले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.