भारनियमन मुक्ती झाली सक्ती

By Admin | Updated: September 22, 2014 00:53 IST2014-09-22T00:37:59+5:302014-09-22T00:53:46+5:30

मंठा: शहराला भारनियमन मुक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यांतच ही भारनियमन मुक्ती सक्ती होऊन बसली. त्यामुळे अर्धेगाव अंधारात तर अर्धेगाव प्रकाशात राहत आहे.

The burden of reducing the liberation | भारनियमन मुक्ती झाली सक्ती

भारनियमन मुक्ती झाली सक्ती


मंठा: शहराला भारनियमन मुक्त करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही महिन्यांतच ही भारनियमन मुक्ती सक्ती होऊन बसली. त्यामुळे अर्धेगाव अंधारात तर अर्धेगाव प्रकाशात राहत आहे. एकाच गावात महावितरणकडून दुजाभाव केल्या जात असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
मंठा हे तालुक्याचे ठिकाण आहे. गावात महावितरचे घरगुती ग्राहकांकडील वीज बील वसुलीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळेच काही महिण्यापूर्वी मंठा शहर भारनियमनाच्या कचाट्यातून सुटले होते.
संपूर्ण शहर भारनियमन मुक्त करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र हा आनंद औट घटकाचा ठरला. काही दिवस भारनियमन मुक्त केल्यानंतर महावितरणने हा पुन्हा भारनियमन सुरू केले.
सध्या अर्ध्या गावात भारनियमन सुरू आहे. तर बाजारपेठ परिसरात भारनियमन मुक्त आहे. भारनियमनामुळे अर्धेगाव अंधारात असते. तसेच भारनियमना व्यतीरिक्त अनेक वेळा वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ महावितरणच्या कारभाराला कंटाळले आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांनी वीज बिल भरण्यासाठी पाठ फिरविली आहे.(वार्ताहर)
शहरातील बाजार गल्ली परिसरातील८५० वीज ग्राहकांची भारनियमनातून सुटका करण्यात आली आहे. उर्वरित गावातील ३३०० ग्राहकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत प्रस्ताव पाठविलेला असून तो मंजूर होताच संपूर्ण शहराचे भारनियमन बंद करण्यात येईल. यासाठी वीजग्राहकांनी आपले थकित बिल वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे असे कनिष्ठ अभियंता योगेश जाधव यांनी लोकमतशी बोलताना सागितले.
४मंठा शहर भारनियमन मुक्त करण्यात आले होते. मात्र पुन्हा भारनियमन सुरू करण्यात आले. संपूर्ण शहर भारनियमन मुक्त करण्यासाठी मंठा येथील महावितरणच्या कार्यालयाने याबाबत प्रस्ताव जालना व औरंगाबाद येथील कार्यालयात पाठविला आहे.

Web Title: The burden of reducing the liberation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.