शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक; एक-दोन शिक्षकी शाळांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:08 PM

ZP School मूळ ज्या कामांसाठी नियुक्ती आहे तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होतेय दुर्लक्षजिल्हा परिषद शाळांतील स्थिती अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे 

औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रीत केल्यास व इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.

राष्ट्रीय पातळीवर जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्विकारली आहे. मात्र, त्याशिवाय बांधकाम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे, अनेक वेळी मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांना शिक्षकांचा विरोध असताना शिक्षकांना त्या कामात जुंपले जाते. या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मूळ ज्या कामांसाठी नियुक्ती आहे तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. शिक्षकांना काही कामांसाठी मानधन मिळते. ते मानधन सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्यास त्यांनाही लाभ होईल आणि कामाचा बोझाही शिक्षकांवर येणार नाही. अन्यथा त्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनाने निर्माण करायला पाहिजे, असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनी सांगितले.

७४ एक शिक्षकी शाळांचे हालजिल्ह्यात ७४ शाळा एक शिक्षकी आहेत. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी तर दोन शिक्षकी शाळांचीही मोठी संख्या असल्याने एक शिक्षक शिक्षकेतर कामांत अडकून असतो तेथील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.

शासकीय योजनांचा भार- शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकाॅर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.

अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.- विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्याला शिक्षणाव्यतिरिक्त कामे दिली गेली तर ते करतात. मात्र, शिक्षक मूळ ज्या कामासाठी नेमला त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ नये. यासाठी प्रयत्न करत आहोत.- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी

२,१३१ जिल्हा परिषदेच्या शाळा८,५०३ जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या२,१७,८१३ जि. प. शाळा विद्यार्थी संख्या

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाAurangabadऔरंगाबादTeacherशिक्षक