रानडुकराने घेतला तिघांना चावा
By Admin | Updated: March 14, 2016 00:42 IST2016-03-14T00:26:31+5:302016-03-14T00:42:10+5:30
तुळजापूर : तालुक्यातील किलज येथे एका रानडुकराने तिघांना चावा घेवून गंभीर जखमी केले़ ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून,

रानडुकराने घेतला तिघांना चावा
तुळजापूर : तालुक्यातील किलज येथे एका रानडुकराने तिघांना चावा घेवून गंभीर जखमी केले़ ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून, या घटनेने किलजसह परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़
अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे ग्रामीण भागातील गावा-गावात, शिवारात अनेक वन्यप्राणी येवू लागले आहेत़ मुळज येथील बिबट्याचा हल्ला हा तर जिल्ह्याला हदरा देणारी घटना होती़ तुळजापूर तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडेठाक पडल्याने वन्यप्राण्यांचीही पाण्यासाठी भटकंती सुरू आहे़ किलज शिवारात एका रानडुकराने घुसखोरी केली़ या रानडुकराने ६५ वर्षीय केशव रूकला पवार यांच्या पायाला, डोक्याला चावा घेतला़ या घटनेत केशव पवार हे गंभीर जखमी झाले आहेत़ तर राम शाम राठोड (वय-१२) व गणेश दगडू राठोड (वय-२०) या युवकांनाही या रानडुकराने चावा घेतला आहे़ अचानक रानडुकराने हल्ला करून तिघांना चावा घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे़ जखमींना उपचारासाठी तुळजापूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ जखमींवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़