चाकूचा धाक दाखवून वस्तीवर धाडसी दरोडा
By Admin | Updated: May 30, 2017 22:59 IST2017-05-30T22:55:50+5:302017-05-30T22:59:07+5:30
आष्टी : तालुक्यातील पिंपळगावघाट शिवारातील एका वस्तीवर चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली.

चाकूचा धाक दाखवून वस्तीवर धाडसी दरोडा
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : तालुक्यातील पिंपळगावघाट शिवारातील एका वस्तीवर चाकुचा धाक दाखवून लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. यामध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास केला. यामध्ये ग्रामस्थांनी एका दरोडेखोराला पकडून चांगलाच चोप दिला.
रामनाथ सुखदेव बनकर हे शेतवस्तीत राहतात. सोमवारी पहाटे सहा दरोडेखोरांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यांना काही समजण्याच्या आतच त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या घरातील १ लाख १५ हजाराचे दागिने आणि रोख ४० हजार रुपये असा १ लाख ५५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. याचवेळी पळून जाणाऱ्या दरोडेखोरांपैकी एकाला आश्रमशाळेजवळ ग्रामस्थांनी पकडून बेदम चोप दिला. याप्रकरणी रामनाथ बनकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दरोडेखोराविरोधात अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.