बैलांच्या दरात घसरण; गायींचे भाव वाढलेलेच
By Admin | Updated: July 11, 2016 00:29 IST2016-07-10T23:47:23+5:302016-07-11T00:29:42+5:30
नेकनूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलांना मागणी वाढलेली असताना त्यांचे भाव पडलेलेच आहेत. दुसरीकडे दुग्धोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल असून, गायींचे भाव कडाडलेले आहेत.

बैलांच्या दरात घसरण; गायींचे भाव वाढलेलेच
नेकनूर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बैलांना मागणी वाढलेली असताना त्यांचे भाव पडलेलेच आहेत. दुसरीकडे दुग्धोत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल असून, गायींचे भाव कडाडलेले आहेत.
रविवारी येथे आठवडी बाजार भरतो. गत आठवड्यात मध्यम बैलजोडीची किंमत ५० ते ६० हजार रूपये एवढी होती. या रविवारी ती ४० ते ५० हजारापर्यंत गडगडली. दुसरीकडे मागील आठवड्यात ३० ते ३५ हजार रूपयांना मिळणारी गाय आता ४० ते ४५ हजार रूपयांपर्यंत महाग झाली आहे.
मशागतीसाठी बैलांचा वापर करण्याऐवजी बहुतांश शेतकरी अत्याधुनिक अवजारांचा अवलंब करीत आहेत. बैलांचा सांभाळ करण्यासाठी मनुष्यबळ व चारा खर्ची पडतो. त्यामुळे बैलांना मागणी कमी झाल्याचे व्यापारी शेख तौफिक यांनी सांगितले. पहिल्या दोन पावसानंतर चाऱ्याची उपलब्धता वाढली आहे. त्यामुळे चारा-पाण्याअभावी दुग्ध व्यवसाय बंद करणाऱ्यांनी पुन्हा एकदा दुग्धोत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने गायींच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे भाववाढ झाल्याचे असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
शेतकरी मिर्झा मुश्रीफ, बाळासाहेब रोकडे म्हणाले, मोठा पाऊस आवश्यक आहे. त्याशिवाय चाऱ्याची टंचाई दूर होणार नाही. सध्या चाऱ्याचे भाव वाढलेलेच असून, ते परवडणारे नाहीत. (वार्ताहर)