बीडमधील १४ घरांवर फिरणार बुलडोझर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:09 IST2017-10-11T00:09:00+5:302017-10-11T00:09:00+5:30
बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनजवळील तब्बल १४ घरांवर ुुबुधवारी बुलडोझर फिरविण्यात येणार आहे.

बीडमधील १४ घरांवर फिरणार बुलडोझर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बार्शी रोडवरील राष्ट्रवादी भवनजवळील तब्बल १४ घरांवर ुुबुधवारी बुलडोझर फिरविण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता ही मोहीम हाती घेण्यात येणार असून यासाठी पालिकेने पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी भवनच्या बाजूच्या रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमणे करून रस्त्यावरच घरे बांधली आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अनेक दिवस हे प्रकरण न्यायालयात चालले. आता उच्च न्यायालयानेच हे अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने नगर पालिकेने तयारी केली असून जेसीबी, ट्रॅक्टर व इतर बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस बंदोबस्तही मागविला असून तसे पत्रही पोलीस प्रशासनाला दिले आहे. अनेक वर्षानंतर मोठी कारवाई होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.