उद्घाटनाच्या ‘पंचायती’त अडकली ३ कोटींची इमारत
By Admin | Updated: October 4, 2016 00:48 IST2016-10-04T00:30:25+5:302016-10-04T00:48:21+5:30
औरंगाबाद : ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद पंचायत समितीसाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय घेतला.

उद्घाटनाच्या ‘पंचायती’त अडकली ३ कोटींची इमारत
औरंगाबाद : ग्रामीण भागातील विकासकामांना चालना मिळावी म्हणून काँग्रेस आघाडी सरकारने तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद पंचायत समितीसाठी अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. तब्बल पावणेतीन कोटी रुपये खर्च करून टुमदार इमारत आठ महिन्यांपूर्वीच उभारण्यात आली आहे. शिवसेना-भाजपमधील अंतर्गत वादात या इमारतीचे उद्घाटन रखडले आहे. जिल्हा परिषद प्रशासन या इमारतीचा ताबाही घेण्यास तयार नाही. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेली इमारत सध्या धूळखात पडून आहे.
मागील चार दशकांपासून औरंगाबाद पंचायत समितीचा कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील गणेश कॉलनी येथे अत्यंत पडक्या इमारतीत चालत होता. मागील दहा वर्षांपासून औरंगाबाद पंचायत समितीला अद्ययावत इमारत उभारून द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. काँग्रेस आघाडी सरकारनेही मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन इमारतीसाठी तब्बल पावणेतीन कोटींचा निधी उपलब्ध करून दिला. पंचायत समितीची जुनी इमारत पाडून नवीन इमारतीचे भूमिपूजन २२ फेब्रुवारी २०१४ रोजी मोठ्या थाटामाटात करण्यात आले.
मागील दोन वर्षांपासून पंचायत समितीचे कार्यालय रेल्वेस्टेशन भागात नेण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आजही पैसे खर्च करून रेल्वेस्टेशनला ये-जा करावी लागते.