इमारत, रस्त्याची कामे रडारवर !

By Admin | Updated: July 30, 2015 00:43 IST2015-07-30T00:34:35+5:302015-07-30T00:43:45+5:30

वाशी : तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी बुधवारी अचानक पाहणी केली.

Building, road works on the radar! | इमारत, रस्त्याची कामे रडारवर !

इमारत, रस्त्याची कामे रडारवर !


वाशी : तालुक्यातील पारा ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी बुधवारी अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच दहा लाख रूपये मंजूर असतना तेराव्या वित्त आयोगातून आणखी २ लाख रूपये खर्च केले कसे? असा प्रश्न उपस्थित करून सदरील कामाच्या चौकशीचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.
तालुक्यातील पारा, पारगाव, फ क्राबाद या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत यांनी जावून वेगवेगळ्या कामांची पाहणी केली. पारा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु, हे काम करीत असताना त्याच्या दर्जाकडे लक्ष दिले नसल्याचे दिसून आले. खिडक्या, दरवाजे आदी कामांबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करीत गटविकास अधिकारी ढवळशंख यांना संबधित कामाची चौकशी करण्याचे आदेश दिले. १० लाखांच्या निधीचे इ-टेंडरिंग करून सदरील काम करण्यात आले. त्यामुळे सदरील कामाचे मुल्य दहा लक्ष रूपये असताना पंचायत समितीच्या १३ व्या वित्त आयोगातून २ लक्ष रूपये जास्तीचे खर्च झालेचे कसे? असा प्रश्न त्यांनी केला. उपस्थितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवा सादर करण्याचे निर्देश गटविकास अधिकारी ढवळशंख यांना दिले आहेत. यावेळी पारा ग्रामपंचायतीचे उपसरपंच अतुल चौधरी, चंद्रकांत भराटे, सुंदर माळी आदींची उपस्थिती होती.

Web Title: Building, road works on the radar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.