बाजार संकुलाची इमारत सहा वर्षापासून रखडली
By | Updated: November 28, 2020 04:11 IST2020-11-28T04:11:16+5:302020-11-28T04:11:16+5:30
नाचनवेल : जिल्हा परिषद प्रशालेसमोर गेल्या सहा वर्षांपासून बाजार संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र ते अद्यापही पूर्ण झाले ...

बाजार संकुलाची इमारत सहा वर्षापासून रखडली
नाचनवेल : जिल्हा परिषद प्रशालेसमोर गेल्या सहा वर्षांपासून बाजार संकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहेत. मात्र ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याने त्या कामाबद्दल नागरिकांत शंका उपस्थित होत आहे. ग्रामपंचायतीच्या जागेवर ही इमारत उभारली जात असून काही महिन्यापासून काम बंद आहे. यासाठी किती निधी मंजूर आहे, आजपर्यंत किती खर्च झाला, काम कधीपर्यंत पूर्ण होईल असे एक ना अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
या बाजार संकुलाच्या उभारतीचे काम कुठल्या कारणाने रखडले हेच नेमके समोर येत नाही. एका कनिष्ठ अभियंत्याने या कामाचे कंत्राट स्थानिक ठेकेदारकडे सोपवून परस्पर बिले उचलली असल्याचा आरोप नागरिकामधून होत आहे. त्यामुळे पुढील काम बंद असल्याने व्यापाऱ्यासह नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या इमारती काम झाले तर ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार आहे. मात्र उर्वरित कामे कधी होतील याबाबत कुणीच स्पष्ट सांगत नाही. इमारतीचे काम रखडल्याने तिथे मोकाट जनावरांचा संचार वाढला आहे. यासंबंधी ग्रामसेवक ए.बी. गोर्डे म्हणाले मला याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचह याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---- कोट ----
कामाची चौकशी करावी
बाजार संकुलाचे गाळे वर्षानुवर्षे अपूर्ण अवस्थेत असल्याने जागेची उपयोगिता शून्य आहे. नाचनवेल व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे गाव असून परिसरातील जवळपास १० ते १५ गावाचा संबंधी येतो. बाजारपेठेचे गाव असल्याने त्यांना आपले साहित्य ठेवण्यासाठी या इमारतीचा उपयोग होणार होता. मात्र काम रखडल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून इमारत बांधकामाचा प्रश्न निकाली काढावा.
- छाया थोरात, सरपंच
----------
- कॅप्शन : नाचनवेल येथील बाजार संकुलाच्या इमारतीचे रखडलेले बांधकाम.