सभागृह बांधकाम, रस्त्यावर अधिक भर

By Admin | Updated: July 25, 2014 00:27 IST2014-07-24T23:48:31+5:302014-07-25T00:27:49+5:30

सतीश जोशी , परभणी चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यात प्रामुख्याने सीसीरोड बांधकाम आणि सभामंडप, सभागृहावर भर दिला आहे.

Building the hall, more on the road | सभागृह बांधकाम, रस्त्यावर अधिक भर

सभागृह बांधकाम, रस्त्यावर अधिक भर

सतीश जोशी , परभणी
चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आमदारांनी जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यात प्रामुख्याने सीसीरोड बांधकाम आणि सभामंडप, सभागृहावर भर दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून तत्पूर्वी या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.
सिमेंट रस्ता बांधकामासाठी आ. सीताराम घनदाट यांनी १४ कामांसाठी ७१ लाख रुपये, आ. मीराताई रेंगे यांनी दहा कामांसाठी ३० लाख रुपये, आ. बोर्डीकर यांनी ९ कामांसाठी २८ लाख रुपये तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ८ कामांसाठी ३८ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे. सिमेंट रस्ता नाली बांधकामासाठी आ. बोर्डीकर यांनी चार कामांसाठी १५ लाख तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी ८ कामांसाठी ६२ लाखांंचा निधी प्रस्तावित केला.
सिमेंट रस्ता व सिमेंट नाली बांधकामासाठी आ. मीराताई रेंगे यांनी एका कामासाठी ३ लाख, आ. बोर्डीकर यांनी १७ कामांसाठी ७६ लाख तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी दोन कामांसाठी ९ लाखांचे प्रस्ताव पाठविले आहेत.
छोट्या पुलांच्या बांधकामासाठी आ. घनदाट यांनी एका कामासाठी ७ लाख रुपयांचे काम प्रस्तावित केले आहे. आ.दुर्राणी यांनी आपल्या निधीतून स्मशानभूमी शेडच्या तीन कामांसाठी १८ लाख रुपये प्रस्तावित केले आहेत.
आ. बोर्डीकर यांनी सुलभ शौचालयाच्या एका कामासाठी २ लाख रुपये प्रस्तावित केले. सार्वजनिक दिवाबत्तीच्या चार कामांसाठी बाबाजानी यांनी १५ लाख रुपये तर अंगणवाडी-बालवाडीच्या एका कामासाठी १० लाख रुपये प्रस्तावित केले.
विधानपरिषद सदस्य आ.दिवाकर रावते यांनीही परभणी जिल्ह्यातील नाला बंधाऱ्याच्या तीन कामांसाठी ३० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला आहे.
परभणी जिल्ह्यात आ. बोर्डीकर यांनी या आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख रुपयांची, आ. बाबाजानी दुर्राणी यांनी १ कोटी ८६ लाख रुपयांची तर आ. सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली आहेत. आचारसंहितेपूर्वी या कामांना प्रशासकीय मान्यता मिळवून ती पूर्ण करणे आवश्यक आहे.
सभामंडपावर अधिक भर
जिंतूरचे आ. रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभामंडप ८ आणि सामाजिक सभागृह बांधकामाचे पाच प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यात खालोखाल गंगाखेडचे आ.सीताराम घनदाट यांनी १ कोटी ५२ लाख रुपयांची कामे प्रस्तावित केली असून त्यात सभामंडप ८ आणि सामाजिक सभागृह बांधकाम ४ चा समावेश आहे. पाथरीच्या आ.मीराताई रेंगे यांनी त्यांच्या मतदारसंघात सभामंडप बांधकामाचे ९ प्रस्ताव दाखल केले आहेत.
विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्राणी यांनी सभामंडप बांधकामाचे चार आणि सामाजिक सभागृह बांधकामाचा एक असे पाच प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केले आहेत. घनदाट यांनी सभागृह बांधकाम आणि सामाजिक सभागृह बांधकाम यासाठी ७४ लाखांचा निधी, मीराताई रेंगे यांनी ९ कामांसाठी ४७ लाख रुपयांचा निधी, बोर्डीकर यांनी १३ प्रस्तावांसाठी ५० लाख रुपयांचा निधी तर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी पाच प्रस्तावांसाठी ३४ लाख रुपयांचा निधी सभामंडप बांधकाम आणि सामाजिक सभागृह बांधकाम यासाठी प्रस्तावित केला आहे. यानंतर आमदार महोदयांनी आपली पसंदी सीसी रोड बांधकामासाठी दिली आहे.

Web Title: Building the hall, more on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.