शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत फ्लॅट न देणाऱ्या बिल्डरला महारेराचा फटका; व्याजासह द्यावी लागणार संपूर्ण रक्कम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:25 IST

बिल्डरला ही संपूर्ण रक्कम एक महिन्यात द्यावी लागणार आहे.

औरंगाबाद : करारानुसार तक्रारदारांना निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा न देणाऱ्या बिल्डरने चार तक्रारदारांना त्यांची संपूर्ण रक्कम २ टक्के व्याजासह परत करण्याचा आदेश पुणे येथील महाराष्ट्र स्थावर मालमत्ता संपदा नियामक प्राधिकरणाने (महारेरा) दिला आहे. त्याचप्रमाणे वरील चौघांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ७० हजार ते एक लाख रुपये आणि तक्रारीचा खर्च म्हणूनही प्रत्येकी २० हजार रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे. बिल्डरला ही संपूर्ण रक्कम एक महिन्यात द्यावी लागणार आहे.

तक्रारदार दिनेश राठोड, दीपक जाधव, सुनील गवळी आणि ज्योती त्रिभुवन यांनी औरंगाबादेतील मिटमिटा येथील मे. नरहरी बिल्डर्सचे भागीदार अनिल सोनवणे आणि प्रफुल्ल ब्रह्मेचा यांच्या वरील प्रकल्पात प्रत्येकी एक फ्लॅटची नोंदणी केली होती. त्या सर्वांचा नोंदणीकृत करार झाला होता. त्यानुसार १८ महिन्यांत त्यांना फ्लॅट देण्याचे करारात म्हटले होते; परंतु वरील चौघांना निर्धारित वेळेत फ्लॅटचा ताबा मिळाला नाही. म्हणून त्या चौघांनी अ‍ॅड. आनंद मामीडवार यांच्यामार्फत ‘महारेरा’कडे तक्रार दाखल केली होती. 

सुनावणीअंती प्राधिकरणाने दिनेश राठोड यांना एकूण ११ लाख ५१ हजार ५०० रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. राठोड यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे. ज्योती त्रिभुवनला एकूण ११ लाख ५० हजार रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. 

त्रिभुवन यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ९० हजार रुपये, तसेच दीपक जाधव यांना एकूण १४ लाख ९४  हजार ९३८ रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. जाधव यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ८५ हजार रुपये, त्याचप्रमाणे सुनील गवळी यांना एकूण ९ लाख ९२ हजार १८४  रुपये २ टक्के व्याजासह देण्याचा आदेश दिला. गवळी यांनी फ्लॅटची संधी गमावल्याबद्दल भरपाई म्हणून ७० हजार रुपये देण्याचे आणि तक्रारीचा खर्च म्हणूनही प्रत्येक तक्रारदाराला २० हजार रुपये देण्याचे आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Rera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017AurangabadऔरंगाबादMONEYपैसा