शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून साडेचार लाख रुपये पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:36 IST

बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देखळबळ: कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोरील घटना

औरंगाबाद : बांधकाम व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दुचाकीस्वार चोरट्यांनी साडेचार लाख रुपये पळविल्याची घटना कोकणवाडी चौकातील जय टॉवरसमोर सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. पैशाची बॅग पळविण्याच्या सलग घडणाऱ्या घटनांमुळे रोखीने व्यवहार करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.गारखेडा परिसरातील परिमल हौसिंग सोसायटीतील रहिवासी निवृत्ती लक्ष्मणराव सूर्यवंशी यांचे कोकणवाडीतील जय टॉवर येथे सूर्यवंशी इंजिनिअर्स आणि मुलाचे साकेत बिल्डर्स या नावाने कार्यालय आहे. सोमवारी त्यांना मजुरांचे पेमेंट करायचे होते. त्यांनी त्यांचे बांधकाम व्यावसायिक मित्र सचिन कासलीवाल (रा. रामकृष्णनगर, गारखेडा) यांच्यासोबत सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर येथील भारतीय स्टेट बँकेत कारने (एमएच-२० सीएच ४४०४) गेले. तेथे त्यांनी बँकेतून रोख ४ लाख ५५ हजार रुपये काढले आणि ते कारने आकाशवाणी, क्रांतीचौक मार्गे कोकणवाडी येथील जय टॉवर येथे आले. कासलीवाल यांना जेवण करण्यासाठी घरी जायचे असल्याचे त्यांनी सूर्यवंशी यांना सांगितले. तेव्हा दहा मिनिटांत कार्यालयातील काम आटोपून आपण सोबतच गारखेड्यात जाऊ असे सूर्यवंशी म्हणाले. त्यांनी ४ लाख ५५ हजार रुपयांपैकी पाच हजार रुपये खिशात काढून ठेवले आणि उर्वरित साडेचार लाख कारच्या समोरच्या दोन्ही सीटमध्ये ठेवून कार लॉक करून ते दोघे कार्यालयात गेले. त्यानंतर पाच ते सात मिनिटांनी एका तरुणाने कारची काच फोडली व पैसे चोरून साथीदारासह दुचाकीवर बसून पळून गेला.शेजारील कारचालकाने केला पाठलागकासलीवाल यांच्या कारशेजारी कॉन्ट्रॅॅक्टर हेमंत खेडकर यांची कार उभी होती. या कारमध्ये खेडकर यांचा चालक संदीप पवार मोबाईलवर गेम खेळत बसला होता. शेजारील कारची काच फुटल्याचा आवाज त्याला आला. तेव्हा एक तरुण कारजवळ उभा दिसला. तो त्या कारचा चालक असावा,असे वाटल्याने पवार पुन्हा मोबाईलवर गेम खेळू लागला. त्या तरुणाने कारमधून पैशाची बंडले काढून शर्टमध्ये टाकत पळ काढल्याचे पवारला दिसले. त्यामुळे पवार त्याला पकडण्यासाठी पळाला. तेव्हा चोरटा खाली पडला आणि पुन्हा उठून साथीदाराच्या दुचाकीवर बसून सुसाट निघून गेला.गुन्हे शाखेकडून सीसीटीव्हीची तपासणीशास्त्रीनगर येथील एसबीआय बँकेपासूनच चोरट्यांनी सूर्यवंशी आणि कासलीवाल यांच्यावर पाळत ठेवली असावी, असा पोलिसांना संशय आहे. घटनेची माहिती कळल्यानंतर उपायुक्त डॉ. निकेश खाटमोडे पाटील, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, वेदांतनगर ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर रोडगे, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, राहुल सूर्यकांत, उपनिरीक्षक विजय पवार, उपनिरीक्षक शेख अफरोज आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांनी वापरलेल्या मोटारसायकलचा क्रमांक पोलिसांना मिळाला असून, शास्त्रीनगर बँक ते कोकणवाडी जय टॉवरपर्यंतच्या सीसीटीव्हीची तपासणी पोलिसांनी सुरू केली आहे. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस