शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

फ्लॅटबाबत बिल्डरने फसवले; तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाईचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 12:35 IST

मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये द्या - राज्य आयोग

छत्रपती संभाजीनगर : तिन्ही तक्रारकर्त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई तसेच मानसिक आणि शारीरिक त्रासापोटी प्रत्येकी ५० हजार रुपये तक्रार दाखल झाल्यापासून ९ टक्के व्याजासह देण्याचे आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या औरंगाबाद खंडपीठाने गोल्डन ड्रीम्स बिल्डर्स प्रा. लि. यांना दिले.

तसेच आदेशापासून ३ महिन्यांत करारात नमूद सर्व सोयीसुविधा आणि पूर्णत्वाचे प्रमाणपत्रही देण्याचे आदेश पीठासीन अधिकारी मिलिंद सोनवणे व सदस्य डॉ. निशा चव्हाण आणि नागेश कुंबरे यांनी दिले आहेत.

काय होती तक्रार ?याप्रकरणी मंजूषा सुनील भराडकर, सुनील भराडकर यांनी संयुक्तपणे आणि सौरभ सुभाष भराडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अर्जदारांनी गोल्डन ड्रीम्स बिल्डर्स प्रा. लि. यांच्याकडे त्यांच्या गोल्डन ड्रीम्स आयटी बिझिनेस पार्क येथे २८ मार्च २०१२ ला २७ लाख ८१ हजार रुपयांना फ्लॅट बुक केला होता. सौरभ यांनी २०१३ मध्ये १९ लाख ८० हजार रुपयांना फ्लॅट बुक केला. यावेळी झालेल्या करारानुसार संपूर्ण सोयी-सुविधांसह फ्लॅटचा ताबा एका वर्षात देण्यात येणार होता. या प्रकल्पात एकंदर २५ सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले होते. तक्रारदारांना फ्लॅटचा ताबा वेळेत दिला नाही, करारात नमूद केल्याप्रमाणे सोयीसुविधा पुरविल्या नाहीत तसेच ‘पूर्णत्वाचे प्रमाणपत्र’ दिले नसल्यामुळे त्यांनी तक्रार दाखल केली होती. एका वर्षात ताबा देण्याचे कबूल करूनही प्रत्यक्षात २०१७ मध्ये त्यांना ताबा देण्यात आला. त्यातही सुविधांचा अभाव आणि पूर्णत्व प्रमाणपत्र मिळालेच नाही. मंचात तक्रार दाखल करून अर्जदारांनी नुकसानभरपाई आणि सर्व सोयी-सुविधा पुरविण्याचे आदेश देण्याची विनंती केली. अर्जदारांच्या वतीने ॲड. नसीम शेख यांनी काम पाहिले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी