बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंदच
By Admin | Updated: June 17, 2017 23:52 IST2017-06-17T23:50:04+5:302017-06-17T23:52:18+5:30
आखाडा बाळापूर : बीएसएनएलची इंटरनेट सेवा बाळापूर येथे गेल्या चार महिन्यांपासून बंदच असून दूरसंचार अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.

बीएसएनएलची इंटरनेट सेवा बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : बीएसएनएलची इंटरनेट सेवा बाळापूर येथे गेल्या चार महिन्यांपासून बंदच असून दूरसंचार अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत असून शैक्षणिक कामे खोळंबली आहेत.
याबाबत दूरसंचार अधिकाऱ्यांना वेळोवेळी लेखी निवेदने, प्रत्यक्ष भेट घेऊन येथील इंटरनेट सेवेअभावी शैक्षणिक कामे खोळंबल्याची व विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती दिली. परंतु अधिकाऱ्यांनी फक्त आश्वासने दिली. सध्या शैक्षणिक अर्ज, बँकसेवा, नोकरभरती अर्ज, शासन योजना, व्यक्तिगत तसेच सामाजिक, शासकीय कामांसाठी आॅनलाईन अर्ज करावे लागतात.