‘बीएसएनएल’च्या बॅटऱ्या केल्या लंपास
By Admin | Updated: April 2, 2017 23:39 IST2017-04-02T23:36:22+5:302017-04-02T23:39:01+5:30
उस्मानाबाद : चोरट्यांनी परंडा तालुक्यातील शेळगाव येथील बीएसएनएलच्या एक्सजेंच इमारतीतील १३ हजार ६०० रूपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्या़

‘बीएसएनएल’च्या बॅटऱ्या केल्या लंपास
उस्मानाबाद : चोरट्यांनी परंडा तालुक्यातील शेळगाव येथील बीएसएनएलच्या एक्सजेंच इमारतीतील १३ हजार ६०० रूपयांच्या बॅटऱ्या लंपास केल्या़ तर तुळजापूर तालुक्यातील कसई शिवारातून दोन म्हशीही लंपास केल्या असून, या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
परंडा तालुक्यातील शेळगाव शिवारात बीएसएनएलची एक्सचेंज इमारत आहे़ या इमारतीचा दरवाजाचे कुलूप तोडून ३० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ आतील १३ हजार ६०० रूपयांच्या २०० ए़एच़च्या ६८ बॅटऱ्या लंपास केला़ ही घटना समोर आल्यानंतर परंडा कार्यालयातील कनिष्ठ दूरसंचालक चंद्रशेखर प्रभाकर पाठक यांनी आंबी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ पाठक यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द अंबी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.