बीएसएनएल सेवेला लागले ग्रहण
By Admin | Updated: May 7, 2014 00:25 IST2014-05-07T00:24:46+5:302014-05-07T00:25:05+5:30
बिडकीन : येथील बी.एस.एन.एल. कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झाले असून, मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन आदी सुविधा कुठल्याही क्षणी बंद पडते, तरीही अधिकारी मात्र या कार्यालयाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

बीएसएनएल सेवेला लागले ग्रहण
बिडकीन : येथील बी.एस.एन.एल. कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झाले असून, मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन आदी सुविधा कुठल्याही क्षणी बंद पडते, तरीही अधिकारी मात्र या कार्यालयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. बिडकीन गावास डी.एम.आय.सी. होणार असल्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बँकांच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत. त्यांना कोअर बँकिंगसाठी बी.एस.एन.एल.च्या इंटरनेट सेवेची अत्यंत आवश्यकता असते; परंतु बी.एस.एन.एल.च्या सततच्या खंडित सेवेमुळे अडचणी येत आहेत, तसेच ए.टी.एम. सेवाही त्यामुळे खंडित होते. बिडकीन येथील कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणावर मोबाईल सीमकार्ड, कृषी कार्ड दिलेले असून, २० ते २५ वेळा प्रयत्न करूनही बी.एस.एन.एल.चा मोबाईल लागत नाही. त्यामुळे ग्राहकास दुसर्या खाजगी सेवेचा वापर करावा लागत आहे. तो ग्राहकास महाग पडत असून, खिशाला अतिरिक्त झळ पोहोचत आहे. विजेचे भारनियमन सात ते आठ तास होत असून, या काळात बी.एस.एन.एल. कार्यालयातील खूप जुने असलेले जनरेटर व बॅटर्या या मात्र एक तासाच्या पुढे चालत नाहीत. सध्या अद्ययावत जनरेटर व बॅटर्या बसवून बी.एस.एन.एल. सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी बँक अधिकारी, नागरिक, शेतकरी करीत आहेत. बिडकीन गाव हे डी.एम.आय.सी. अंतर्गत येत असल्यामुळे येथे चांगली सेवा देण्यासाठी तांत्रिक अधिकारी व अन्य कर्मचारी यांची नेमणूक करून सेवा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.