बापू सोळुंके, औरंगाबादभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) गुंडाळण्यासाठी दिल्लीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे. त्याअनुषंगाने २१ आणि २२ आॅगस्ट रोजी देशभरातील प्रत्येक राज्याच्या बीएसएनएल मुख्य महाव्यवस्थापकांची बैठक दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे.वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, बीएसएनएलने मोबाईल, इंटरनेट सेवेत पदार्पण केल्यानंतर देशात दूरसंचार क्षेत्रात फार मोठी क्रांती झाली. खाजगी कंपन्या इन्कमिंग कॉलसाठी चार्जेस आकारत होते. त्यांनी सर्व प्रकारच्या सेवाशुल्कात कपात केली. ग्राहक सेवेला प्राधान्य देणारे बीएसएनएल मात्र दोन वर्षांपासून तोट्यात आले आहे. २०१२ साली आणलेल्या नवीन टेलिकॉम धोरणानुसार बीएसएनएलची मालकी आणि मनुष्यबळाची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला.गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएलला नवीन इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी निधी दिला जात नाही. एवढेच नव्हे तर दहा वर्षांत एकाही नवीन अधिकारी, कर्मचाऱ्याची भरती करण्यात आली नाही. उलटपक्षी दरवर्षी दहा हजार कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत, तरीही बीएसएनएलमध्ये २ लाख कर्मचारी अतिरिक्त असल्याचा अहवाल डिओलाईट या खाजगी सल्लागार संस्थेने नुकताच केंद्र शासनास दिला आहे. कर्मचाऱ्यांची कपात केली तरच तोटा कमी करण्यावर उपाय असल्याचे शासनास पटवून देण्यात आले आहे. बीएसएनएलमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे कपात करावी आणि केवळ तेथे सेल्स प्रतिनिधी आणि मेटेनन्स सांभाळणारे दोन- चार कर्मचारी ठेवावे, असा सल्ला खाजगी एजन्सीने दिला आहे. २१, २२ आॅगस्ट रोजी दिल्लीत बैठकया एजन्सीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यासाठी बीएसएनएलने देशभरातील प्रत्येक राज्याच्या बीएसएनएल मुख्य महाव्यवस्थापकांची बैठक २१ आणि २२ आॅगस्ट रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचारी कपातीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.बीएसएनएल वाचविण्यासाठी विविध कर्मचारी संघटना एकत्र आल्या आहेत. संघटनांनी देशपातळीवर जॉइंट फोरम स्थापन केला आहे. कर्मचारी संघटनांना बाजूला ठेवून केंद्र सरकार बीएसएनएल खाजगी कंपन्यांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी जॉइंट फोरमने १२ आॅगस्ट रोजी संचार सदनासमोर निदर्शने केली. तसेच २१ आॅगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीच्या वेळीही निदर्शने करणार आहेत. - रंजन दाणी, अध्यक्ष, बीएसएनएल जॉइंट फोरम
बीएसएनलची गाशा गुंडाळण्याची तयारी
By admin | Updated: August 17, 2014 01:42 IST
बापू सोळुंके, औरंगाबाद भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) गुंडाळण्यासाठी दिल्लीवरून जोरदार हालचाली सुरू झाल्या असल्याची धक्कादायक माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.
बीएसएनलची गाशा गुंडाळण्याची तयारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}