केवळ पाचशे रुपयांसाठी केली विकासची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:02 IST2021-04-11T04:02:27+5:302021-04-11T04:02:27+5:30

औरंगाबाद : आरबीआयची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला आलेल्या विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. हरिचा तांडा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या ...

The brutal murder of Kelly Vikas for only five hundred rupees | केवळ पाचशे रुपयांसाठी केली विकासची निर्घृण हत्या

केवळ पाचशे रुपयांसाठी केली विकासची निर्घृण हत्या

औरंगाबाद : आरबीआयची परीक्षा देण्यासाठी औरंगाबादला आलेल्या विकास देवीचंद चव्हाण (२३, रा. हरिचा तांडा, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) या तरुणाच्या हत्येचा उलगडा करण्यात सिटीचौक पोलिसांना घटनेनंतर अवघ्या काही तासांत यश आले.

त्याच्याजवळचे पाचशे रुपये लुटण्यासाठीच आरोपीने विकासला लिफ्ट देण्याचा बहाणा करून महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानात नेले. आरोपीचा मनसुबा लक्षात येताच विकासने त्याचा जोरदार प्रतिकार केल्यामुळे आरोपीने त्याच्यावर शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारून टाकल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. शेख शहारुख शेख फिरोज (२७, रा. जुना बाजार) असे आरोपीचे नाव आहे. शहारुख हा मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवासी पळवून तो खाजगी ट्रॅव्हलला देण्याचे काम कमिशन तत्त्वावर करीत होता. जुनाबाजार येथे तो आईसोबत राहतो. त्याला नशेच्या गोळ्या खाण्याचे व्यसन आहे. गुरुवारी रात्री गावाहून औरंगाबादला आलेला विकास बसस्थानकावरील फलाटावर झोपला होता. पहाटे पाच वाजता आरोपी शहारुखची त्याच्यावर नजर पडली. कुठे जायचे आहे, असे त्याने विकासला विचारले. परीक्षा देण्यासाठी शहरात आल्याचे आणि चिकलठाणा एमआयडीसीतील परीक्षा सेंटरवर त्याला जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा आरोपीने मलापण तिकडेच जायचे आहे. तुला माझ्या दुचाकीवरून तेथे सोडतो, अशी थाप मारली. अनोळखी शहरात कुणीतरी मदतीचा हात पुढे करतो हे पाहून विकास त्याच्या सोबत जाण्यास तयार झाला. यानंतर विकासला दुचाकीवर बसवून आरोपी महापालिका कार्यालयामागील कब्रस्तानात गेला. दुचाकी थांबवताच आरोपीने विकासला त्याच्याजवळील पैसे काढण्यासाठी धमकावले. विकासच्या खिशात पाचशे ते सहाशे रुपये होते. ही रक्कम देण्यास त्याने नकार दिला. यानंतर आरोपीने दादागिरी करीत विकासच्या खिशातील पाकिटाला हात घातला. त्याचा विरोध केल्याने त्यांच्यात झटापट सुरू झाली. या वेळी आरोपी शहारुखने धारदार शस्त्राने विकासच्या छाती, पोट, गळ्यावर वार करण्यास सुरुवात केली. या वेळी घाव रोखत असताना आरोपीलाही ओरखडले गेले. त्याच्या हातावर शस्त्राने वार करून एक हात कोपरापासून अलग करीत निर्घृण हत्या करून आरोपी पसार झाला.

==========

हात सापडला ठाकूर बस्तीत एका घराच्या पत्र्यावर

आरोपीने विकासची हत्या करताना त्याचा हात धडावेगळा केला होता. हा हात घटनास्थळी नव्हता. एवढेच नव्हेतर, काल दिवसभर शोध मोहीम राबवूनही हात सापडला नव्हता. दरम्यान, शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घटनास्थळालगतच्या ठाकूरवस्ती (नयी बस्ती) येथील अब्दुल कदीर शेख यांना घराच्या पत्र्यावर हात पडलेला असल्याचे दिसले. ही बाब त्यांनी पोलिसांना कळविली. पोलिसांनी हा हात जप्त केला. मांजराने मृत विकासचा हात नेला असावा, असा अंदाज पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी व्यक्त केला.

Web Title: The brutal murder of Kelly Vikas for only five hundred rupees