शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीला भेटायला आलेल्या भावाचा वीज कोसळून मृत्यू;छत्रपती संभाजीनगरास अवकाळीचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:48 IST

अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री, पैठण, कन्नड या तालुक्यांत शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला. वादळी वाऱ्यामुळे काही घरे, तसेच गुरांच्या गोठ्यावरील टिनपत्रे उडाली. शेतात उभे असलेल्या गहू, सूर्यफूल, मका, बाजरी, कांदा, कांदा बीजोत्पादन या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच सिल्लोड तालुक्यातील सिरसाळा तांडा येथे बहिणीला भेटायला आलेल्या अंबादास भिका राठोड (वय २७, रा. वरसाडा तांडा, ता. पाचोरा, जि. जळगाव) या तरुणाचा वीज अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. तर सिल्लोड तालुक्यातीलच वसई व सिरसाळा येथे वीज पडून पाच गायी दगावल्या.

सिल्लोड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊससिल्लोड तालुक्यातील आठ महसूल मंडळांत शुक्रवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. सिरसाळा तांडा परिसरात वीज पडून एक तरुण व दोन गायी तर वसई शिवारात तीन गायी ठार झाल्या. या पावसामुळे शेतपिकांचेही मोठे नुकसान झाले. तर डोंगरगाव येथील एका हॉटेलवर निलगिरीचे झाड कोसळून नुकसान झाले.

सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळ्यासह परिसरातील भायगाव, वरखेडी, बाभूळगाव बु. निल्लोड, भवन आदी गावांमध्ये शुक्रवारी (दि.७) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे लग्न संमारंभाच्या वऱ्हाडाची चांगलीच धांदल उडाली. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सोयगाव तालुक्यात वीज पडून चार जखमीसोयगाव तालुक्यातील वरखेडी तांडा येथे शेतात झाडाखाली उभे असलेले चौघे जण वीज कोसळून गंभीर जखमी झाले. अमरसिंग तुळशीराम जाधव (वय ३७), सुरेश बळीराम राठोड (वय २८), गौरव सुरेश राठोड (वय १२), आश्विन शिवलाल राठोड अशी जखमींची नावे आहेत. वरखेडी तांडा येथे वरील चौघे जण शुक्रवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी ३ वाजेदरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी चौघे जण झाडाच्या आडोशाला उभे राहिले. तेव्हा अचानक वीज पडून चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारासाठी जळगाव येथे नेण्यात आले. वेताळवाडी शिवारात एक बकरी वीज पडून ठार झाली.

कन्नड तालुक्यात जोरदार पाऊसकन्नड : तालुक्यातील नाचनवेल, पिशोर, करंजखेड, चिंचोली लिंबाजी या भागात सायंकाळी एक तास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे शेतात उभी असलेली गहू, सूर्यफुल, मका, कांदा, कांदा बीजोत्पादन या पिकांसह आंब्याला मोठा फटका बसला आहे. अचानक पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबादRainपाऊस