भाऊ, कर्जाचे पैसे जनावरे विकून दे, पण पैसे पचवू नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 00:39 IST2017-06-09T00:39:05+5:302017-06-09T00:39:05+5:30
खोलमारा येथील ईश्वर मदनकर या शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली.

भाऊ, कर्जाचे पैसे जनावरे विकून दे, पण पैसे पचवू नको
भारत दाढेल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत काढलेल्या बँक खात्यातून पैसे काढण्यास निर्बंंध घातल्याने केंद्र शासनाच्या योजनेचे कोडे अधिकाऱ्यांना उलगडत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यातील ७ हजाराहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा निधी मिळूनही तो काढता येत नसल्याने जनधनचे खाते डोकेदुखी ठरले आहे़
गोरगरिबांच्या कल्याणासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेंतर्गत १ लाख २० हजार रूपयांचे घरकुल बांधून देण्यात येत आहे़ त्यासाठी आॅनलाईन निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे़ पहिल्या हप्ता ३० हजार दुसऱ्या हप्त्यात ६० व शेवटच्या हप्त्यात ३० हजार रूपये बँकेत जमा करण्यात येत आहेत़
जनधन योजनेंतर्गत लाभार्थ्यांनी बँकेत खाते काढले आहेत़ या खात्यावरच घरकुलाचा हप्ता जमा होत आहे़ परंतु जनधनच्या बँक खात्यातन केवळ १० हजार रूपयेच काढता येत असल्याने लाभार्थ्यांची कुचंबणा होत आहे़ निधी मिळूनही तो खर्च करता येत नसल्याने घरकुलांचे कामे अर्धवट आहेत़ यासंदर्भात अधिकारीही लाभार्थ्यांना मदत करण्यास असमर्थ ठरत आहेत़
दरम्यान, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या प्रकरणी तोडगा काढण्याची सूचना केली होती़ भारतीय रिझर्व बँकेनेच यासंदर्भात निर्बंध लावल्याने स्थानिक पातळीवर कोणतेही निर्णय घेतले जाऊ शकत नसल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे़ दोन्ही योजना शासनाच्या असल्या तरी एका योजनेचे पाय दुसऱ्या योजनेत अडकल्याने दोन्ही योजनांचा गुंता कायम आहे़
रिझर्व बँक या संदर्भात निर्णय घेऊ शकते़ त्यासाठी रिझर्व बँकेच्या मुंबई कार्यालयातील मुख्य अधिकाऱ्यांनी शिफारस करणे आवश्यक आहे़ पण असे होत नसल्याने घरकुलाचा पैसे लाभार्थ्यांच्या खात्यातच पडून आहे़ यासंदर्भात जिल्हाधिकारी डोंगरे यांनी रिझर्व बँकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बैठक नांदेडला बोलावली आहे़ यावेळी हा प्रश्न मांडण्यात येणार आहे़
जि़ प़ ग्रामीण विकास यंत्रणेने यापूर्वीही बँक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन लाभार्थ्यांच्या खात्यातून ३० हजार रूपये काढण्यासाठी सवलत द्यावी, अशी मागणी केली होती़ त्यानुसार लाभार्थ्यांना २० हजार रूपयांपर्यंत खात्यातून पैसे काढता येतील, असा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़