राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत राज जंगमे याला कास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 00:23 IST2018-01-08T00:23:47+5:302018-01-08T00:23:55+5:30

नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत औरंगाबादच्या राज जंगमे याने कास्यपदक जिंकले. बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळातील ज्युदो क्लबमध्ये सराव करणाºया राज जंगमे याने १४ वर्षांखालील ३४ किलो वजन गटात हे कास्यपदक जिंकले.

Bronze to the Raj Jungle in National School Judo Tournament | राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत राज जंगमे याला कास्य

राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत राज जंगमे याला कास्य


औरंगाबाद : नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय ज्युदो स्पर्धेत औरंगाबादच्या राज जंगमे याने कास्यपदक जिंकले. बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळातील ज्युदो क्लबमध्ये सराव करणाºया राज जंगमे याने १४ वर्षांखालील ३४ किलो वजन गटात हे कास्यपदक जिंकले. आॅर्चिड टेक्नो स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणाºया राज जंगमे याने याआधी ४ वेळेस राज्यस्तरीय ज्युदो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. राज जंगमे याला मुख्य प्रशिक्षक भीमराज रहाणे, अशोक जंगमे, शैलेश कावळे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटनेचे अध्यक्ष अजित मुळे, सचिव अतुल बामणोदकर, विश्वजित भावे, विश्वास जोशी, एकनाथ जाधव, बजाजनगर व्यायाम व क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पवार, नामदेव दौड, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Bronze to the Raj Jungle in National School Judo Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.