शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

‘आरटीओ’त दलालांची चांदी सुरूच, लर्निंग लायसन्ससाठी १५० रुपये जास्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2022 12:50 IST

कार्यालयातील सर्वच कामे ऑनलाईन झाली आहेत; परंतु दलालांचा विळखा कायम आहे.

औरंगाबाद : ऑनलाईन शाॅपिंग केली जाते, ऑनलाईनवर खाद्यपदार्थांची ऑर्डरही दिली जाते; परंतु अजूनही वाहनधारक आरटीओ कार्यालयातील कामकाज स्वत: ऑनलाईन करीत नसल्याची परिस्थिती आहे. कोणी वेळ नाही म्हणून, तर कोणी ऑनलाईन अर्ज भरण्याची आणि आरटीओ कार्यालयात चकरा मारण्याची कटकट नको म्हणून सरळ दलालांचा रस्ता धरतात. अशांकडून दलाल मंडळी चांगलीच रक्कम उकळतात. लर्निंग लायसन्ससाठी शासकीय शुल्काच्या तुलनेत १५० रुपये अधिक दलालांकडून आकारले जात असल्याचे रिॲलिटी चेकमधून समोर आले.

राज्यातील पहिले ऑनलाईन कार्यालय म्हणून औरंगाबाद आरटीओ कार्यालयाची ओळख आहे. कार्यालयातील सर्वच कामे ऑनलाईन झाली आहेत; परंतु दलालांचा विळखा कायम आहे. स्वत:हून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया करण्यापेक्षा दलालांना पैसे देऊन मोकळे झालेले बरे, असे म्हणत रोज अनेक वाहनधारक दलालांना गाठतात. लर्निंग लायसन्स असो की पर्मनंट लायन्सस अथवा वाहनासंबंधी इतर कामांसाठी; दलालांनी सांगितलेली रक्कम थोडी कमी करायची आणि कामे करून घ्यायची, असा प्रकार सुरू आहे.

शासकीय दर आणि दलालांचे दरकामकाज- शासकीय दर-दलालांचे दरलर्निंग लायसन्स-३५१-५००पर्मनंट लायसन्स-७६४-१८०० ते २०००वाहन ट्रान्स्फर-५५०-१२०० ते १५००आरटीओतील एकूण कर्मचारी-१४९

दलालांची संख्या ३०० पेक्षा जास्तआरटीओ कार्यालयातील दलालांची संख्या ३०० पेक्षा जास्त आहे. कोणत्याही गुंतवणुकीशिवाय हे काम करता येत असल्याने अनेक तरुण या कामाकडे वळले आहेत. कार्यालयाच्या परिसरात लॅपटाॅपवर कामे करताना अनेक जण दिसतात.

काय आणि कधी पाहिजे ते सांगा ?‘लोकमत’च्या प्रतिनिधीने लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या परिसरात एका चारचाकीत बसून असलेल्या दलालाला विचारणा केली. तेव्हा लर्निंग आणि पर्मनंट असे दोन्ही लायसन्ससाठी एकत्रित २५०० रु. सांगण्यात आले. लर्निंग लायसन्स १५ मिनिटांत मिळून जाईल आणि पर्मनंट लायसन्ससाठी महिनाभरानंतर चाचणी द्यावी लागेल, असे दलालाने सांगितले. त्यावर केवळ लर्निंग लायसन्ससाठी किती पैसे लागतील, असे विचारता ५०० रु. सांगितले.

सर्व कामे ऑनलाईन, एजंटांकडे जाण्याची गरज नाहीआरटीओ कार्यालयातील सर्व कामे ऑनलाईन होतात. त्यासाठी एजंटांकडे जाण्याची गरज नाही. ऑनलाईन शाॅपिंग केली जाते. त्याचप्रमाणे वाहनासंबंधी कामेही ऑनलाईन सहजपणे करता येतात.- संजय मेत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबाद