शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

औरंगाबाद महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:32 PM

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी ...

ठळक मुद्देआयुक्त खरे बोलले : महापौर म्हणतात, ‘अनवधानाने बोलले असतील...’

औरंगाबाद : महापालिकेत समस्या घेऊन सर्वसामान्य नागरिक कमी आणि दलाल जास्त येतात, असे विधान आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी केले. या विधानावरून एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी महापौरांनी दलालीच्या मुद्यावर सारवासारव करीत अनवधानाने आयुक्त बोलले असतील असे नमूद केले. ‘लोकमत’ने दलालीच्या मुद्यावर काही विभागांमध्ये चाचपणी केली असता आयुक्त १०० टक्के खरे बोलल्याचे दिसून आले. महापालिकेच्या चार विभागांमध्ये दलालांशिवाय पानही हलत नाही, हे वास्तव कोणालाही नाकारता येणार नाही.नगररचना विभागबांधकाम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, गुंठेवारी आदी कामांसाठी सर्वसामान्य नागरिक अक्षरश: उंबरठे झिजवतात. मात्र, त्यांची कामे होत नाहीत. कारण त्यांनी दलालांमार्फत फाईल दाखल केलेली नसते. थेट फाईल दाखल केली असल्यास नंतर दलालांची मदत घेतलेली नसते. ज्यांना या विभागाची परंपरा माहीत आहे, त्या बांधकाम व्यावसायिकांची फाईल अजिबात कुठेच थांबत नाही. सध्या या विभागात ८०० फायलींचा डोंगर साचला आहे. कोणत्या अधिकाऱ्याकडे किती फायली प्रलंबित आहेत याचा हिशेबच नाही. ज्या मालमत्ताधारकांनी दलालांमार्फत ‘इच्छा’तीच फाईल बाहेर निघते. एखाद्याने खूपच राग, रोष व्यक्त केल्यास त्याच्या फाईलमध्ये एवढ्या त्रुटी काढण्यात येतात की, आयुष्यभर तो त्रुटींची पूर्तता करू शकत नाही.अतिक्रमण विभागया विभागात बोटावर मोजण्याऐवढेच चमत्कारिक अधिकारी व कर्मचारी आहेत. या विभागात दरवर्षी सुमारे १५०० तक्रारी प्राप्त होतात. त्यातील फक्त ५० ठिकाणीच कारवाई होते. कारवाई करण्यासाठी यांची ‘मर्जी’ सांभाळावी लागते. ज्या व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात कारवाई होणार आहे, त्याला जास्त नुकसान होऊ देणार नाही म्हणून ही मंडळी अलगदपणे आपला वाटा काढून घेतात. या सर्व व्यवहारासाठी दलालांची भूमिका सर्वात मोठी ठरते. माहिती अधिकारात माहिती मिळवून तक्रार देण्यासाठी या विभागातील अधिकारी व कर्मचाºयांनी वॉर्डनिहाय दलाल नेमून ठेवले आहेत. दिवसभरात एवढी ‘माया’ आपण सोबत नेली पाहिजे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्व जण काम करतात.मालमत्ता विभागमहापालिकेसाठी सोन्याची अंडी देणारा हा विभाग होय. मात्र, मागील काही वर्षांमध्ये या विभागातही प्रचंड दलाली वाढली आहे. महापालिकेच्या जागा परस्पर ३० वर्षांसाठी भाडेकरारावर देणे, महापालिकेच्या दुकानांमधील भाडेकरूंकडून वसुली करणे, पण मनपात जमा न करणे, होर्डिंग व्यवसायात मनपाच्या तिजोरीत कमी आणि आपल्या खिशात जास्त महसूल कसा जाईल यादृष्टीने सर्वदूर प्रयत्न सुरू असतात. पार्किंग, बाजार आदी ठिकाणी वसुलीसाठी दलालच नेमून ठेवले आहेत.वॉर्ड कार्यालयेशहरात महापालिकेचे नऊ वॉर्ड कार्यालये आहेत. प्रत्येक वॉर्ड कार्यालयात कामाच्या स्वरुपानुसार दलाल मंडळी नेमलेले आहेत. जन्म-मृत्यू प्रमाणपत्रापासून नवीन कर लावून देणे, जुनी थकबाकी असेल तर त्यात मार्ग काढून देणे, अनधिकृत नळ, साफसफाई आदी प्रत्येक ठिकाणी दलालांचा सुळसुळाट झालेला आहे. दलालांशिवाय येथेही पान हलत नाही. वॉर्ड अधिकारी, वॉर्ड अभियंत्यांना ही बाब माहीत नाही, असे नाही. उलट या मंडळींमुळेच अधिकारी व कर्मचाºयांचा खडतर ‘मार्ग’ अधिक सोपा होतो.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliticsराजकारण