७० वर्षीय वृद्धेला कारमधून आणून टाकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:02 IST2017-08-07T00:02:00+5:302017-08-07T00:02:00+5:30

७० वर्षीय वृद्ध महिलेला कारमधून आणून मुकुंदवाडी- रामनगरातील एका रुग्णालयाजवळ टाकण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. वृद्ध महिलेला तिचे नावही नीट सांगता येत नाही.

 Bringing 70-year-old elderly out of the car | ७० वर्षीय वृद्धेला कारमधून आणून टाकले

७० वर्षीय वृद्धेला कारमधून आणून टाकले

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ७० वर्षीय वृद्ध महिलेला कारमधून आणून मुकुंदवाडी- रामनगरातील एका रुग्णालयाजवळ टाकण्यात आले. ही घटना शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. वृद्ध महिलेला तिचे नावही नीट सांगता येत नाही.
चिकलठाण्याकडून मुकुुं दवाडीकडे जाणाºया रस्त्यावरील लाइफलाइन रुग्णालयाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथेच या वृद्धेस शनिवारी रात्री सोडून देण्यात आले.
कालरात्रीपासून रविवारी रात्री उशिरापर्यंत ती वृद्ध महिला एकाच ठिकाणी बसून असल्याचे पाहून इमारतीच्या वॉचमनने तिला पिण्यासाठी पाणी दिले. तिच्या अंगावर शाल आहे. तिला नाव सांगता येत नाही. रात्री सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे ही महिला आजारी पडेल ही बाब लक्षात घेऊन वॉचमनने तेथून जाणाºया संतोष वाहुळे या विद्यार्थ्यास याबाबतची माहिती दिली. वाहुळे यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना कळविली. मुकुंदवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतरही तासभर त्या महिलेस मदत मिळाली नव्हती.

Web Title:  Bringing 70-year-old elderly out of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.