राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संस्था आणणार
By Admin | Updated: October 11, 2014 00:40 IST2014-10-11T00:31:56+5:302014-10-11T00:40:20+5:30
औरंगाबाद : वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहरात राष्ट्रीय पातळीवरील सरकारी आरोग्य संस्था उभारण्याचा संकल्प राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.

राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संस्था आणणार
औरंगाबाद : वेगाने विकसित होणाऱ्या औरंगाबाद शहरात राष्ट्रीय पातळीवरील सरकारी आरोग्य संस्था उभारण्याचा संकल्प राजेंद्र दर्डा यांनी केला आहे.
शहरातील सुमारे ५२ हजार घरांपर्यंत जाऊन कुटुंबाशी भेट घेऊन ‘व्हिजन औरंगाबाद’ हे शहराच्या विकासाचे चित्र राजेंद्र दर्डा यांनी मांडले आहे. राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संस्था या शहरात असावी, अशी सूचना हजारो नागरिकांनी केली. त्यामुळे आगामी काळात शहरात राष्ट्रीय पातळीवरील आरोग्य संस्था उभी राहणार असल्याचे राजेंद्र दर्डा म्हणाले.
शहरात शासकीय कॅन्सर हॉस्पिटल उभारणीतील त्यांचे योगदान तर सर्वश्रुतच आहे. आरोग्यसेवेचा वसा घेतलेले राजेंद्र दर्डा यांनी म्हणूनच येत्या काळात शहरात नवीन वैद्यकीय सुविधा शहरवासीयांना देण्याचा संकल्प केला आहे.
शहरासह जिल्ह्यातील गरीब नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय हे एकमेव मोठे रुग्णालय आहे. घाटी रुग्णालयात वेळोवेळी आधुनिक यंत्रणा आणण्यात राजेंद्र दर्डा यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. याच घाटी हॉस्पिटलमध्ये गरिबांसाठी किडनीरोपणाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. याशिवाय याच ठिकाणी हृदय आणि मेंदूच्या अवघड शस्त्रक्रिया करण्याची सुविधा निर्माण केली जाणार आहे.
घाटी रुग्णालयावरील ताण लक्षात घेता आणि नागरिकांची सोय लक्षात घेऊन नवीन औरंगाबादमध्येही घाटी रुग्णालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक आणि सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. यामुळे या परिसरातील सुमारे चार ते साडेचार लाख नागरिकांसाठी ही सुविधा निर्माण होईल, तसेच न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब) अत्याधुनिक करण्यात येणार
आहे.
तसेच शहरात सरकारी क्रिटिकल केअर सेंटर उभारणीसाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे.